Shanaya Kapoor : संजय कपूरच्या लेकीचा स्टायलिश लूक, 'या' लेहेंग्याची किंमत ऐकून व्हाल थक्क
शनाया कपूर करण जोहरच्या ‘बेधडक’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूड पदार्पणापूर्वीच शनायाने तिच्या स्टाईल आणि ग्लॅमरने लाखो चाहत्याची मनं जिंकली आहेत.
शनाया इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या लूक आणि स्टाईलमधील फोटो आणि प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते.
सोशल मीडिया यूजर्समध्ये शनायाची स्टाईल नेहमीच सुपरहिट ठरते. शनायाने इंस्टाग्रामवर वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये शनाया कधी लेहेंगा-चोली तर कधी वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसत आहे.
शनायाचे आऊटफिट जितके सुंदर आहेत तितकेच महागही आहे.
शनायाने तिची बहीण रिया कपूरच्या लग्नात हा सुंदर पिवळा रंग परिधान केला होता. जो तिने डिझायनर ब्लाउजसोबत कॅरी केला होता. या लेहेंग्याची किंमत 78 हजार रुपये आहे जी अर्पिता मेहताच्या कलेक्शनमधून होती.
शनाया फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या प्री-वेडिंग पार्टीमध्ये पोहोचली होती. तेव्हा ती हॉल्टर नेक ड्रेसमध्ये दिसली होती. हा ड्रेस Vayalo आणि Vesper ब्रँडचा आहे, ज्याची किंमत 67,704 रुपये आहे.
शनायाचा प्रिंटस बाय राधिका’ कलेक्शनच्या या रेड प्रिंटेड लेहेगा-चोलीची किंमत 90 हजार रुपए आहे.
शनायाच्या फ्लेयर्ड स्कर्ट ड्रेसनेही बरीच चर्चा झाली होती. याची किंमत 1,85000 रुपये आहे.