PHOTO : कपूर कुटुंबाची लाडकी लेक, बॉलिवूडवरही दिसला होता करिश्माचा ‘करिश्मा’!
कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मा कपूर (Karisma Kapoor ) हिने फिल्मी दुनियेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री करिश्मा कपूर ही 90 मधील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. आज (25 जून) ती आपला वाढदिवस साजरा करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजघडीला करिश्मा मनोरंजन विश्वात सक्रिय नसली तरी, तिची प्रसिद्धी जराही कमी झालेली नाही. अभिनेत्रीने तिच्या शानदार कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले, ज्यामुळे करिश्मा आजही तिच्या चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवते.
करिश्मा चित्रपटांमुळे चर्चेत राहिलीच, पण ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली.
करिश्माने करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न करून अनेक चाहत्यांची हृदयं तोडली. संजय कपूरसोबतच्या नात्यामुळे अभिनेत्री करिश्मा कपूर चांगलीच चर्चेत आली होती.
कुटुंबाची संमती नसतानाही तिने बॉलिवूड विश्वात पदार्पण केले होते. करिश्मा कपूरने 1991मध्ये 'प्रेम कैदी' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. करिश्माने आपल्या कुटुंबाच्या संमतीशिवाय बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता.
मात्र, अनेकदा करिश्माने ही गोष्ट नाकारली होती. तिने म्हटले होते की, असे काहीच नाही. उलट कपूर घराण्यात सगळ्यांनाच अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. जरा नीतू कपूर आणि बबिता कपूर यांनी लग्नानंतर जर चित्रपटविश्वात काम करणे सोडले असेल, तर तो त्यांचा स्वतःचा निर्णय होता. (Photo : @therealkarismakapoor)