Independence Day 2021 Movies: देशभक्तीने ओतप्रोत भरलेले हे 10 चित्रपट पाहिलेत का?
देश 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. जवळपास दोन वर्षांपासून कोरोनासारख्या साथीशी लढणाऱ्या देशवासियांसाठी ही वेळ थोडी खास आहे. मात्र, बाहेर कोरोना संसर्ग असल्याने उत्सवासाठी सार्वजनिक कार्यक्रम टाळणे योग्य आहे. असे अनेक पर्याय आहेत, ज्याद्वारे आपण स्वातंत्र्यदिनाचा उत्सव खास करू शकता. आज आम्ही तुम्हाला काही खास देशभक्तीपर चित्रपट सांगणार आहोत, जे तुमचा दिवस कारणी लावतील.(Photo : wikipedia)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉर्डर : 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित हा चित्रपट बॉलिवूडच्या सर्वात यशस्वी युद्ध चित्रपटांपैकी एक आहे. सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना यांच्यासह अनेक स्टार्सनी सजलेल्या या युद्धपटात भारतीय लष्करी जवानांच्या शौर्याची कहाणी दाखवण्यात आली आहे.(Photo : wikipedia)
तिरंगा : 1993 मध्ये आलेला हा चित्रपट नाना आणि राजकुमार या दोघांच्या अभिनयामुळे प्रचंड गाजला. ही फिल्म सुपरहिट ठरली. आजही हा चित्रपट प्रेक्षकांना भुरळ घालतो.(Photo : wikipedia)
लगान : आमिर खानच्या कारकिर्दीला जबरदस्त चालना देणारा हा चित्रपट स्पोर्ट चित्रपटांमध्येही प्रसिद्ध आहे. चित्रपटात स्वातंत्र्यपूर्व पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे. भारतातील एका छोट्या गावातील शेतकरी आणि ब्रिटिशांचे कुशल क्रिकेट संघ यांच्यातील सामना प्रेक्षकांना खिळवून ठेवतो(Photo : wikipedia)
रंग दे बसंती : आमिर खान, शरमन जोशी, आर माधवन, सोहा अली खान सारख्या स्टार्सनी सजलेला हा मल्टीस्टारर चित्रपट त्याच्या काळातील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटातील व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि दोषांविरोधात लढणारी तरुण पिढी आणि पार्श्वभूमीतील स्वातंत्र्य चळवळ पाहून हा चित्रपट विशेष बनतो.(Photo : wikipedia)
'द लेजंड ऑफ भगत सिंग' (2002) : इंग्रजांना लढा देण्यासाठी भगतसिंग यांनी लढलेला थरारक प्रवास आणि त्यांच्या देशप्रेमाचे या चित्रपटामध्ये चित्रण केले आहे. अभिनेता अजय देवगणने या चित्रपटामध्ये भगत सिंग यांची भूमिका साकारली होती.(Photo : wikipedia)
राझी : ‘राझी’ चित्रपट 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धासंदर्भातली ही कथा आहे. आपल्या देशापुढे आणि कर्तव्यापुढे इतर कोणत्याही गोष्टींना महत्त्व न देणाऱ्या एका धाडसी भारतीय गुप्तहेर स्त्रीची कथा यात आहे. तिच्या या झोकून देण्यावरच संपूर्ण चित्रपटाचं कथानक बेतलं आहे. गुप्तचर म्हणून भावभावना आणि खाजगी आयुष्य कसे पणाला लावावे लागते, हे आपल्या खास शैलीत दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी चित्रपटात मांडले आहे.(Photo : wikipedia)
केसरी : केसरी हा 12 सप्टेंबर 1897 रोजी भारताच्या सारागढीच्या महायुद्धावर आधारित बॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय कुमार हवालदार ईशर सिंहच्या भूमिकेत असून परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहे. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली केसरीची निर्मिती करण जोहर, अरुणा भाटिया, यश जोहर, अपूर्व मेहता आणि सुनीर खेत्रपाल यांनी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केले आहे.(Photo : wikipedia)
गाझी अटॅक : बांगलादेशची निर्मिती होण्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक सागरी युद्ध पाण्याखाली झाले, ते म्हणजे गाझी अटॅक'. सन 1971 मध्ये कुणालाही थांगपत्ता लागू न देता भारत-पाकिस्तानमध्ये ही लढाई पाण्याखाली झाली होती. त्याचीच कथा द गाझी अटॅक'मध्ये मांडण्यात आली आहे. ओम पुरीसह के. के. मेनन, राणा दुग्गुबत्ती, अतुल कुलकर्णी आदी कलाकारांनी आपली कामगिरी चोख पार पाडली आहे. निर्वासित बांगलादेशी तरुणीची भूमिका या चित्रपटात तापसी पन्नूने साकारली आहे. (Photo : wikipedia)
एलओसी कारगिल : 2003 मध्ये कारगिल युद्धावर बनलेल्या पहिल्या चित्रपटाचे नाव 'एलओसी कारगिल' असे होते. हा चित्रपट 12 डिसेंबर 2003 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक जे पी दत्ता होते. या चित्रपटात अजय देवगण, संजय दत्त, अभिषेक बच्चन, करीना कपूर, सैफ अली खान आणि सुनील शेट्टी मुख्य भूमिकेत होते.(Photo : wikipedia)