In Pics : कोरोनाकाळात शूटिंग झालेले सिनेमे; काही ठरले हिट तर काही फ्लॉप
बेल बॉटम - अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम' या सिनेमाचं शूटिंग कोरोनाकाळात झालं होतं. या सिनेमात अक्षयसह वाणी कपूर, सारा दत्ता आणि हुमा कुरॅशी मुख्य भूमिकेत होते. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फक्त 50 कोटींची कमाई करू शकला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेहरांईया - 'गेहरांईया' या सिनेमात दीपिका पादुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत होते. हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला.
गंगूबाई काठियावाडी - 'गंगूबाई काठियावाडी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. सिनेमातील आलियाच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले. या सिनेमाचं शूटिंग कोरोनाकाळात झाल्याने शूटिंगमध्ये अनेक मर्यादा आल्या.
जुग जुग जियो - धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली 'जुग जुग जियो' या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमातील अनेक कलाकारांना शूटिंगदरम्यान कोरोनाची लागण झाली होती. 2020 मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. त्यानंतर 24 जून 2022 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला.
सत्यमेव जयते 2 - मिलाप जावेरी दिग्दर्शित 'सत्यमेव जयते 2' हा सिनेमा कमाईच्या बाबतीत मागे पडला. जॉन अब्राहम या सिनेमात मुख्य भूमिकेत होता. तर दिव्या खोसला कुमारने या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पद्यावर कमबॅक केलं.
चंडीगढ करे आशिकी - 'चंडीगढ करे आशिकी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला. कोरोनाकाळात या सिनेमाचं शूटिंग झालं. शूटिंगदरम्यान सेटवरील अनेक मंडळींना कोरोनाची लागण झाल्याने त्याचा परिणाम सिनेमावर झाला.
गुड बाय - विकास बहलने गुड बाय या सिनेमाचं दिग्दर्शन केलं. या सिनेमात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. पण तरीही बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात हा सिनेमा मागे पडला.
शेरनी - विद्या बालनच्या 'शेरनी' सिनेमाला कोरोनाचा चांगलाच फटका बसला. कोरोनाकाळात या सिनेमाचं शूटिंग थांबलं होतं. पण नंतर हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित न करता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला.
लूप लपेटा - तापसी पन्नूचा 'लूप लपेटा' हा सिनेमा एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा आहे. बजेट जास्ट नसल्याने हा सिनेमा थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. पण हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला.
हीरोपंती 2 - टायगर श्रॉफच्या 'हीरोपंती 2'ची प्रेक्षकांना उत्सुकता होती. पण सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर हा सिनेमा प्रेक्षकांवर आपली छाप सोडण्यात कमी पडला. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला.