In Pics : एक वर्षानंतर आर्यन खान सोशल मीडियावर अॅक्टिव्ह; शेअर केले फोटो
शाहरुख खानचा लाडका मुलगा आर्यन खान गेलं वर्षभर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नव्हता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App15 ऑगस्ट 2021 रोजी आर्यनने शेवटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर आज आर्यनने त्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
आर्यनने त्याच्या इंस्टाग्रामवर दोन सुंदर फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये तो सुहाना खान आणि अबराम खानला मिठी मारताना दिसत आहे.
आर्यनचे हे फोटो शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आर्यनचे वडील शाहरुख यांनीही या फोटोंवर कमेंट केली आहे.
आर्यनने शेअर केलेल्या फोटोवर शाहरुखने कमेंट केली आहे की,माझ्याकडे हे फोटो का नाहीत...लगेच पाठव.
आर्यनचे नाव ड्रग्ज प्रकरणात आल्याने त्याला काही दिवस तुरुंगात जावे लागले होते. पण त्याला क्लीन चीट मिळाली आहे.
आर्यन सध्या अनेक पार्ट्यांमध्येही दिसून येतो.
आर्यन गेलं वर्षभर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसला तरी ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत होता.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर 3 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले होते.
त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती.