Jaya Bachchan : जया बच्चन यांना नव्हता आवडला सलमान-ऐश्वर्याचा हम दिल चुके सनम सिनेमा? संजय लीला भन्साळींनी सांगितला किस्सा
या सिनेमात सलमान खान आणि ऐश्वर्याची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकदाचित काहीच जणांना माहित असेल की, या सिनेमाचं बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये स्क्रिनिंग करण्यात आलं होतं.
याची शिफारस दुसऱ्या कुणी नाही तर ऐश्वर्या बच्चनची सासू आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी केली होती.
पण तेव्हा संजय लीला भन्साळी यांना असं वाटलं होतं की, जया बच्चन यांना हा सिनेमा आवडला नाही.
पण नंतर त्यांना कळालं की, ही शिफारस जया बच्चन यांनी केली होती. त्यानंतर संजय लीला भन्साळी यांचा गैरसमजही दूर झाला.
एका मुलाखतीमध्ये संजय लीला भन्साळी यांनी हा किस्सा सांगताना म्हटलं की, तुम्हाला असं वाटलं असेल की हा सिनेमा आवडला नसेल. पण हा सिनेमा बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये जाणं हाच माझा उद्देश होता, त्यासाठी मी प्रयत्न करत होते.