Happy Birthday Kunal Kapoor : सहाय्यक दिग्दर्शक ते अभिनेता; 'रंग दे बसंती' फेम कुणाल कपूरविषयी जाणून घ्या...
बॉलिवूड अभिनेता कुणाल कपूर आज 45 वां वाढदिवस साजरा करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2004 साली कुणालच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली असली तरी त्याने बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे.
अभिनेता होण्याआधी कुणालने अमिताभ बच्चन आणि मनोज बाजपेयीच्या 'अक्स' या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.
कुणाल कपूर सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.
'रंग दे बसंती' या सिनेमामुळे कुणालला लोकप्रियता मिळाली आहे.
कुणालने डॉन, आजा नच ले, डियर जिंदगी, गोल्ड अशा लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे.
कुणाल कपूर सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. सिनेसृष्टीपासून दूर असूनही त्याचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
'कोई जाने ना' या सिनेमात कुणाल शेवटचा दिसला होता. या सिनेमातील कुणालच्या अभिनयाचे कौतुक झाले होते.
कुणालचा जन्म 1977 साली मुंबईत झाला.