Gautami Patil : तू फक्त तीन गाण्यावरच नाचतेस, प्रेक्षकांच्या आरोपवर गौतमी म्हणते..

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान गोंदियात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गोंदियातील कार्यक्रमात गौतमीवर तू फक्त तीन गाण्यावरच नाचतेच असा आरोप करण्यात आला.

तीन गाण्यावर नाचते या आरोपावर उत्तर देत गौतमी म्हणाली,मी तीन गाण्यांवर नाचते आणि बाकी मुली तीन गाण्यांवर डान्स करतात.
गौतमी म्हणते,तुम्ही फक्त माझाच डान्स पाहता. पण या मुलींचाही डान्स तुम्ही पाहायला हवा. आम्ही 15 मुली तीन-तीन गाण्यावर डान्स करतो.
गौतमी पुढे म्हणते,माझ्या कार्यक्रमातला शेवट खूप महत्त्वाचा असतो. आम्ही सर्व मुली एकत्र येऊन शेवटचा डान्स सादर करतो.
गौतमी आणि गोंधळ याबद्दल बोलताना नृत्यांगणा म्हणाली,कधीतरी गोंधळ होत असतो मात्र प्रत्येक वेळेस होत नाही.
गोंदियात गौतमीने 'राष्ट्रवादी पुन्हा' या गाण्यावर डान्स केला होता.
गौतमी पाटीने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले होते.
इंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान गौतमीने फोटो शेअर केल्यानंतर एकीकडे चाहत्यांनी तिचं कौतुक केलं तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी मात्र तिला ट्रोल केलं.
गौतमीने शेअर केलेल्या फोटोवर एका नेटकऱ्याने मॅच बघ,काय फोटो टाकते...इथे काय सुरू आहे..तुझं काय सुरू आहे..पळ, अशी कमेंट केली आहे.