हिट चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या निर्मातीविरोधात 31 कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा
बॉलिवूडमधील चित्रपट निर्माती प्रेरणा अरोराच्या (Prerna Arora) विरोधात ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रेरणा अरोरा विरोधात ईडीने 31 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ईडीने प्रेरणा अरोराला आज हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते पण ती हजर झाली नाही, तिच्यावतीने तिचे वकील ईडी ऑफिसमध्ये पोहोचले आणि त्यांनी ईडीकडे वेळ मागितला.
अनेक फायनान्सरनं पैसे परत न केल्याचा आरोप प्रेरणावर केला होता. वासु भगनानी यांच्या प्रोडक्शन कंपनीनं प्रेरणाच्या विरोधात नोटिस पाठवली होती. वासु भगनानी यांनी प्रेरणा, तिची आई आणि क्रिआर्ज एंटरटेनमेंटच्या भागीदारा विरोधात तक्रार दाखल कोली होती. त्यानंतर प्रेरणावर गुन्हा दाखल करण्यात आला.
भगनानी यांनी प्रेरणाला 31.6 कोटी त्वरित परत करण्याची मागणी केली. प्रेरणानं काही निर्मात्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट देखील तोडले होते.
कोट्यवधींची फसवणुक केल्या प्रकरणी 2018 मध्ये प्रेरणाला अटक करण्यात आली होती. आठ महिन्यानंतर तिची जामिनावर सुटका झाली होती.
एका मुलाखतीमध्ये प्रेरणानं तिची चुक मान्य केली होती. तिनं सांगितलं होतं की ती पुन्हा नव्यानं सुरुवात करेल.
प्रेरणानं पॅडमॅन, परी आणि टॉयलेट एक प्रेम कथा या हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे.