Shriya Saran : 'दृष्यम' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज, डीप नेक ड्रेसमध्ये मनमोहक अंदाज
Shriya Saran Latest Photoshoot : दृष्यम फेम अभिनेत्री श्रिया सरन आपल्या चित्रपटातील भूमिकांसोबत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते.
Drishyam Actress Shriya Saran
1/10
अभिनेत्री श्रिया सरनने नवीन फोटोशूट शेअर केलं आहे. यामध्ये तिचा सिझलिंग आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.
2/10
नवीन फोटोंमध्ये बोल्ड लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे. ब्लॅक डीप नेक आणि थाय हाय स्लीट ड्रेस सोबत स्मोकी आय लूक आणि सॉफ्ट कर्ल्स असा तिचा लूक आहे.
3/10
अभिनेत्री श्रिया सरनचा 11 सप्टेंबर 1982 रोजी हरिद्वार येथे झाला. ती सध्या 40 वर्षांची आहे.
4/10
अलिकडेच श्रिया सरन 'दृश्यम 2' या चित्रपटात झळकली. श्रिया, अजय देवगण आणि तबू अशी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाने मोठा गल्ला कमावला आहे.
5/10
अभिनेत्री श्रिया सरनने तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ती कथ्थक डान्सर आहे.
6/10
'शिवाजी द बॉस' या 2007 साली आलेल्या अभिनेता रजनीकांत यांच्या चित्रपटात झळकल्यामुळे तिला खरी ओळख मिळाली.
7/10
श्रिया सरन अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया यांच्या तुझे मेरी कसम चित्रपटात झळकली होती. हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता.
8/10
2001 साली आलेल्या 'इश्तम' या तेलुगू चित्रपटातून श्रियाने अभिनयाला सुरुवात केली.
9/10
श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असते. श्रियाच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात. तिच्या सौंदर्याचे चांगलेच कौतुक होत असते.
10/10
अभिनेत्री श्रिया सरनच्या स्टायलिश लूकला चाहत्यांची पसंती मिळते. ती कोणताही लूक उत्तमरित्या कॅरी करते.
Published at : 16 Mar 2023 12:35 PM (IST)