PHOTO : बॉलिवूडची ‘फॅशनिस्टा’ सोनम कपूरबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आज (9 जून) तिचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या सोनम कपूर प्रेग्नंट आहे आणि अशा परिस्थितीत तिचा वाढदिवस आणखी खास असणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोनमला तिच्या वाढदिवसाची उत्सुकता खूप आधीपासून लागली होती. तिने पती आनंद आहुजासोबतचा एक रोमँटिक व्हिडीओ शेअर करून वाढदिवसाच्या आठवड्याची सुरुवात केल्याचा आनंद शेअर केला होता. आज अखेर तो आनंदाचा दिवस आला आहे.
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सोनम तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे. फॅशनला नवी व्याख्या देणारी सोनम अनेकदा तिच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करत असते. अभिनेत्रीच्या रेड कार्पेट लूकपासून ते रोजच्या लूक्सपर्यंत सारंकाही नेहमीच चर्चेत असतं.
पण तुम्हाला माहितीये का, की सोनम कपूरने चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी चक्क वेट्रेसचे काम केले आहे. सोनम कपूर ही बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी आहे. असं असतानाही तिला ही नोकरी करावी लागली होती. सोनम कपूरने हे काम केवळ तिचा पॉकेटमनी वाढवण्यासाठी आणि तिच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी केले होते.
जेव्हा सोनम अवघ्या 15 वर्षांची होती, तेव्हा तिने मलेशियातील एका रेस्टॉरंटमध्ये काम करायला सुरुवात केली. या रेस्टॉरंटमध्ये ती वेटर म्हणून काम करायची. पण, सोनम कपूरने 1 आठवड्यातच ही नोकरी सोडली.
एक काळ असा होता की, सोनम खूप लठ्ठ होती. कॉलेजच्या दिवसांमध्ये लठ्ठपणामुळे लोक अनेकदा तिची खिल्ली उडवत असत. ज्याचा खुलासा खुद्द सोनमने केला होता. सोनम 15 ते 20 वयात असताना पीसीओओएस आजाराशी झुंज देत होती, त्यामुळे तिचे वजन झपाट्याने वाढत होते. पण, आता स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीत सोनम कपूर अग्रक्रमी आहे. (Photo : @ sonamkapoor/IG)