The Kerala Story: द केरळ स्टोरी चित्रपटाबाबत देवोलीनानं शेअर केली खास पोस्ट; म्हणाली...

देवोलीनानं एका नेटकऱ्याच्या ट्वीटला रिप्लाय दिला, माझा नवरा मुस्लिम आहे आणि तो माझ्यासोबत चित्रपट पाहण्यासाठी आला होता. त्यानं चित्रपटाचं कौतुक केले.

(Devoleena Bhattacharjee/instagram)

1/9
एका नेटकऱ्यानं द केरळ स्टोरी या चित्रपटाबाबत एक ट्वीट शेअर केले. या ट्वीटला अभिनेत्री देवोलीनानं (Devoleena Bhattacharjee) दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
2/9
एका नेटकऱ्यानं 'द केरळ स्टोरी' चित्रपटाबाबत एक ट्वीट शेअर केले. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, 'माझ्या सहकाऱ्याची मैत्रीण निधी हिचे आंतरधर्मीय व्यक्तीसोबत संबंध होते. तिने तिच्या प्रियकराला द केरळ स्टोरी चित्रपट पाहण्यास सांगितला. त्याने चित्रपट पाहण्यास केवळ नकारच दिला नाही तर तिचा छळ केला आणि तिच्यावर इस्लामोफोबिक असल्याचा आरोप केला. ती घाबरली आणि तिने तिच्या बॉयफ्रेंडला विचारले की तो इतका रुड का आहे? मुस्लिम व्यक्तीला डेटिंग करत असताना मी इस्लामोफोबिक कशी असू शकते? असा प्रश्न देखील तिनं बॉयफ्रेंडला विचारला. तिच्या बॉयफ्रेंडने उत्तर दिले की जर ती इस्लामोफोबिक नसेल तर तिने इस्लाम धर्म स्वीकारावा आणि त्याच्याशी लग्न करावे. '
3/9
देवोलीनानं एका नेटकऱ्याच्या ट्वीटला रिप्लाय दिला, ' माझा नवरा मुस्लिम आहे आणि तो माझ्यासोबत चित्रपट पाहण्यासाठी आला होता. त्यानं चित्रपटाचं कौतुक केले.
4/9
पुढे तिनं पोस्टमध्ये लिहिलं, 'हा चित्रपट त्यांच्या धर्माविरुद्ध आहे, असे त्याला वाटले नाही. मला असे वाटते की, प्रत्येक भारतीय असे असावे.' या ट्वीटमध्ये देवोलीनानं द केरळ स्टोरी हा हॅशटॅग देखील वापरला आहे.
5/9
देवोलीनानं काही दिवसांपूर्वी जिम ट्रेनर शाहनवाजसोबत लग्नगाठ बांधली. अनेकांनी देवोलीनाला ट्रोल देखील केलं होतं.
6/9
साथ निभाना साथिया या मालिकेमुळे देवोलीना विशेष लोकप्रियता मिळाली.
7/9
देवोलीना ही सोशल मीडिया शाहनवाजसोबतचे फोटो शेअर करत असते.
8/9
देवोलीनाच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात.
9/9
देवोलीनानं बिग बॉस या शोमध्ये देखील सहभाग घेतला होता.
Sponsored Links by Taboola