Deepika Padukone : दीपिकाच्या जांभळ्या साडीने वेधलं सर्वांचं लक्ष, फॅन्सकडून ‘हम आपके हैं कौन’च्या माधुरी दीक्षितशी तुलना; किंमत माहितीय?
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये दीपिका पदुकोणही पोहोचली होती आणि तिचं सौंदर्य आणि स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री दीपिका पदुकोण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दीपिका पदुकोण लवकरच आई होणार आहे आणि तिची प्रेग्नेंसी फॅशन अनेकदा चर्चेत येते.
उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात दीपिकाने हजेरी लावली. यावेळी त्याची किलर स्टाईल पाहून सगळेच भारावले.
अनंत आणि राधिकाच्या संगीत सोहळ्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने जांभळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.
या साडीमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत होती. या स्टाईलमध्ये तिने तिचा बेबी बंपही फ्लाँट केला.
यादरम्यान दीपिकाच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लोही स्पष्ट दिसत होता.
अंबानींच्या पार्टीत 'मॉम टू बी' दीपिकाच्या स्टायलिश अंदाजाने सगळ्यांनाच वेड लावलं आहे.
बेबी बंप फ्लाँट करून दीपिकाने माधुरी दीक्षितची आठवण करून दिली आहे.
'हम आपके है कौन' या चित्रपटात माधुरी दीक्षितने बनावट बेबी बंपसह अशाच प्रकारे जांभळ्या रंगाच्या साडीत नेसली होती.
दीपिकाच्या या जांभळ्या रंगाच्या साडीला सेलिब्रिटी स्टायलिस्ट शालिना नैथानी आणि अंजली चौहान यांनी स्टाइल केली आहे. ही साडी करण तौरानीने खास दीपिकासाठी बनवली आहे.
ही साडी डिझायनरच्या लीला कलेक्शनचा भाग आहे. तौरानीच्या ऑनलाइन स्टोअरवर दीपिकाच्या या साडीच्या सेटची किंमत 1,92,000 रुपये आहे. यातील फक्त साडीची किंमत 1,39,500 रुपये, ब्लाउजची किंमत 46,500 रुपये आणि पेटीकोटची किंमत 7,500 रुपये आहे.