काळ होता तेव्हा लोकांनी डोक्यावर घेतलं, पण व्यसनाच्या आहारी जाताच करिअर धोक्यात; 'हे' दिग्गज सेलिब्रिटी माहिती आहेत का?
बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांना धु्म्रपान, मद्यपान, ड्रग्ज याची सवय लागलेली आहे, असं सर्रास म्हटलं जातं. याच पार्श्वभूमीवर नशेच्या आहारी गेलेल्या अशाच काही सेलिब्रिटिंबद्दल जाऊन घेऊ.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहनी सिंग हे नाव संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. त्याने केलेले रॅपसाँग आजही अनेकजण आवडीने ऐकतात. मात्र त्यालाही ड्रग्ज आणि दारूची फार सवय झाली होती. याबाबतचे वृत्त माध्यमांत झळकल्यानंतर तो लाईमलाईटमधून गायब झाला होता. ड्रग्ज आणि मद्यपानाचे व्यसन सुटावे यासाठी त्याला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये जावं लागलं होतं, असं सांगितलं जातं.
फरदिन कधीकाळी बॉलिवूडमधील एक मोठं नाव होतं. मात्र भारतात बॅन असलेला ड्रग्ज त्यांच्याकडे सापडल्यानंतर ते चांगलेच वादात सापडले होते. त्यानंतर फरदिनला अटक करण्यात आले होते. मिडिया रिपोर्ट्सनुसार ड्रग्जचे व्यसन सुटावे म्हणून फरदिन खानला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये जावं लागलं होतं.
संजय दत्तला ड्रग्ज आणि मद्यपानाची चांगलीच सवय लागली होती. त्याच्या जीवनावर आधारलेला संजू नावाचा चित्रपट नुकताच येऊन गेला. या चित्रपटात ड्रग्ज आणि मद्यपानाची सवय मोडण्यासाठी त्याला किती मेहनत घ्यावी लागली होती, याबाबत विस्ताराने दाखवण्यात आलेलं आहे.
कॉमेडियन कपिल शर्मा यालादेखील मद्यपानाचे व्यसन जडले होते, असे सांगितले जाते. त्यालादेखील हे व्यसन सोडवण्यासाठी रिहॅबमध्ये जावे लागले होते असे सांगितले जाते.
मनीषा कोईराला ही अभिनेत्री एकेकाळी चांगलीच प्रसिद्ध होती. तिने कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करत सर्वांपुढे नवा आदर्श ठेवला होता. मात्र मीडियातील रिपोर्ट्सनुसार मनिषालादेखील दारू पिण्याची सवय लागली होती. याबाबत तिने तिच्या पुस्तकात उल्लेखही केलेला आहे. मद्यपानाच्या सवयीचा तिच्या शरीरावर कसा परिणाम होत होता, याबाबत त्या पुस्तकात लिहिण्यात आलेले आहे.