PHOTO: अभिनेत्री रवीना टंडनच्या मुलीचा ग्लॅम लुक; फोटो पाहाचं!

अभिनेत्री रवीना टंडनची (Raveena Tandon) मुलगी राशा थडानी (Rasha Thandani) ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.(pc:/rashathadani/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राशानं काही दिवसांपूर्वी स्कूल ग्रॅज्युएशन पूर्ण केले. आता राशा ही लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे, असं म्हटलं जात आहे.(pc:/rashathadani/ig)

राशा ही तिच्या पहिल्या चित्रपटात साऊथ स्टार राम चरणसोबत (Ram Charan) स्क्रिन शेअर करणार आहे, असं म्हटलं जात आहे. राशा ही एका तेलुगू चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.(pc:/rashathadani/ig)
imया चित्रपटात राशा ही राम चरणसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. रिपोर्टनुसार, राशाने या चित्रपटासाठी ऑडिशन देखील दिले आहे आणि तिला या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री म्हणून फायनल देखील करण्यात आले आहे.(pc:/rashathadani/ig)
राशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती वेगवेगळ्या लूकमधील फोटो इंस्टाग्राम वर शेअर करत असते. राशाच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.(pc:/rashathadani/ig)
रवीनाच्या 'अंदाज अपना अपना' आणि 'मोहरा' यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तिच्या मोहरा चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' हे आयकॉनिक गाणे आजही लोक आवडीनं बघतात.(pc:/rashathadani/ig)
रवीना प्रमाणेच आता तिची लेक देखील अभिनय क्षेत्रात काम करणार आहे. त्यामुळे आता राशाच्या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.(pc:/rashathadani/ig)
राशाने नुकताच एक नवा लूक शेअर केलाय ज्यात ती पिंक आऊटफिटमध्ये दिसत आहे.(pc:/rashathadani/ig)
यासोबत तिने डायमंड ज्वेलरी पेअर केली आहे.(pc:/rashathadani/ig)