Bollywood Actress : बॉलिवूडच्या Khans सोबत झळकली, पण तरिही प्रसिद्धीपासून वंचित राहिली; 'या' अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?
दिव्या दत्ता फक्त 7 वर्षांची असताना वडिलांच्या निधनानंतर तिची जबाबदारी आईने घेतली. पंजाब मधील अस्थिर वातावरणाच्या काळात ती घाबरून आईच्या दुपट्ट्यामागे लपायची. आपल्याला कोणी गोळी मारू नये यासाठी ती प्रार्थना करायची.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवयाच्या 17 व्या वर्षी दिव्याने 1995 मध्ये सुनील शेट्टी याच्या सुरक्षा चित्रपटात बिंदिया ही व्यक्तीरेखा साकारली होती. सलमान खानच्या वीरगती चित्रपटात सलमानसोबत मुख्य भूमिका मिळाली. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र, हा चित्रपट सलमान खानचा क्लट चित्रपट आहे.
दिव्या दत्ताने 'अग्निसाक्षी'मध्ये जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, मनिषा कोईरालासोबत झळकली. त्यानंतर गोविंदा आणि शिल्पा शेट्टीच्या छोटे सरकारमध्ये ही झळकली. राम आणि श्याम या चित्रपटातही ती सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम करत होती.
दिव्या दत्ता बॉलीवूडमध्ये केवळ सहाय्यक भूमिकांपुरती मर्यादित राहिली. पण तरीही ती पंजाबी सिनेमात चमकली आणि स्टार बनली. तिने गुरदास मान यांच्यासोबत शहीद-ए-मोहब्बत बुटा सिंग या चित्रपटाद्वारे तिच्या प्रवासाला सुरुवात केली आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.
यानंतर, ती शाहरुख खान, प्रीती झिंटा आणि राणी मुखर्जी यांच्यासोबत यश चोप्रांच्या प्रेमकथा 'वीर-झारा'मध्ये शब्बोच्या भूमिकेत दिसली. या भूमिकेने तिला बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली. हा चित्रपट कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जातो. यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिले नाही.
दिव्याने 'स्पेशल 26', 'भाग मिल्खा भाग' यांसारख्या अनेक हिट चित्रपटात काम केले. पण ती अभिनेत्री आजही बॉलिवूडची टॉप अभिनेत्री बनू शकली नाही.
दिव्या दत्ता ही चित्रपटसृष्टीतील एक आउटसाइडर होती. त्यामुळे तिला आपले स्थान निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.
एका मुलाखतीत तिच्या सुरुवातीच्या स्ट्रगलबद्दल बोलताना सांगितले की, एका वेळी किमान 20 चित्रपटांमध्ये तिची रिप्लेसमेंट घेण्यात आली. मात्र, यामुळे त्याचा धीर सुटला नाही.
'इरादा' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर ती काम करत असलेल्या चित्रपटांचा चेहरा बनू लागली.
दिव्याची भूमिका असलेला 'शर्माजी की बेटी' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. या चित्रपटात ती आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. विशेष म्हणजे आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिने दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट असून त्याला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात साक्षी तन्वर, सय्यामी खेर यांच्याही भूमिका आहेत. प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट आहे.