Athiya KL Rahul : अथिया शेट्टी आणि केएल राहुलची क्यूट लव्ह स्टोरी, 'अशी' झाली होती दोघांची भेट
अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया आणि क्रिकेटर केएल राहुल एकमेकांना डेट करत आहेत. ही जोडी बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appक्रिकेट आणि बॉलीवूडमधील नाते काही नवीन नाही, जिथे अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचं क्रिकेटर्ससोबत नातं जुळलं आहे. या यादीत अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथियाचे नाव देखील आहे
आथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुलला बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहे. आज अथियाचा वाढदिवस आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला या दोघांची लव्ह स्टोरी सांगणार आहोत.
अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांची भेट एका पार्टीमध्ये झाली होती.
त्यानंतर दोघांची मैत्री सुरू झाली आणि नंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
अथिया आणि केएल राहुल अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात. सोशल मीडियापासून ते चित्रपट प्रदर्शनापर्यंत दोघांना अनेकदा एकत्र दिसले आहेत.
सुरुवातीला अथिया आणि केएल राहुलने त्यांचं नातं गुप्त ठेवलं होतं. पण गेल्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये अथियाच्या वाढदिवसाला त्यांच्या नात्याचा खुलासा झाला होता.
केएल राहुलने अथिया शेट्टीसोबतचे फोटो शेअर करत 'हॅपी बर्थडे माय लव्ह' असं लिहित पोस्ट केली होती.