Mrunal Thakur Struggle : कधी काळी टोकाचे पाऊल उचलणार होती अभिनेत्री, पण आज गाजवतेय बॉलिवूड...
मृणाल ठाकूर तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. छोट्या पडद्यावरुन करिअरची सुरुवात करणारी ही अभिनेत्री आज बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये धुमाकूळ घालत आहे. मृणाल ठाकूर 1 ऑगस्ट 2024 रोजी 32 वर्षांची झाली. आज ही अभिनेत्री तिचा वाढदिवस साजरा करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमृणाल ठाकूरने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीवरून केली होती. तिने मास मीडियाचे शिक्षण घेतले आहे. पण अभिनेत्री होण्याचे स्वप्न तिने बाळगले होते. 2012 मध्ये मृणाल पहिल्यांदा 'मुझसे कुछ कहते हैं खामोशियां' या मालिकेत दिसली होती. या शोमध्ये तिला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.
यानंतर मृणाल ठाकूरने 'कुमकुम भाग्य' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये बुलबुलच्या बहिणीची भूमिका साकारली होती. या व्यक्तीरेखेमुळे मृणाल घराघरात पोहचली.
'कुमकुम भाग्य' या मालिकेतूनच मृणाल ठाकूर दिग्दर्शकांच्या नजरेत आली. या मालिकेनंतर तिने काही मराठी मालिकांमध्येही काम केले. पण मृणालचे स्वप्न सिने अभिनेत्री बनण्याचे होते. त्यामुळेच त्याने आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
यानंतर 2018 मध्ये मृणालने तिचा पहिला चित्रपट 'लव्ह सोनिया' साइन केला. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुक करण्यात आले. या चित्रपटानंतर मृणाल ठाकूरने मागे वळून पाहिले नाही आणि त्यानंतर तिने'बाटला हाऊस' आणि हृतिक रोशनच्या 'सुपर 30' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
शाहिद कपूरसोबत तिने 'जर्सी' या चित्रपटात काम केले. यानंतर मृणालने ब्लॉकबस्टर ठरलेला दाक्षिणात्य चित्रपट 'सीता रामम'मध्ये काम केले. 'है नन्ना'मध्येही या अभिनेत्रीला चांगलीच पसंती मिळाली होती. अलीकडेच मृणाल ठाकूरने 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात कॅमिओ केला.
यशाचा हा टप्पा गाठण्यासाठी मृणाल ठाकूरला खूप अडचणींचा सामना करावा लागला. खुद्द मृणाल ठाकूरने तिच्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता.
मृणाल ठाकूरने सांगितले होते की, 'एक वेळ अशी आली की काम न मिळाल्याने तिने आत्महत्या करण्याचा विचारही केला. स्ट्रगलच्या काळात ट्रेनमधून उडी मारून आयुष्य संपवण्याचा विचारही त्याच्या मनात आला होता. पण हिंमत न हारण्याचा निश्चय करून यश मिळवले असल्याचे मृणालने सांगितले.