Kiara Advani Photos: कियारा आडवाणीचे किलर फोटोशूट, ब्लॅक साडीत जलवा
अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या आगामी चित्रपट 'जुग जुग जियो' निमित्ताने चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचित्रपटातील भूमिकेसह कियारा आपल्या सौंदर्यासाठीदेखील चर्चेत असते. नुकतेच तिने आपले काही फोटोशूट केले आहे. चाहत्यांना तिच्या सौंदर्याची भुरळ पडली आहे.
कियाराने लेटेस्ट फोटोशूटमध्ये ब्लॅक रंगाची ट्रान्सपरंट साडी परिधान केली आहे. त्याशिवाय ब्लॅक रंगाची टिकली आणि नेकलेसही घातला आहे. कियाराचा हा लूक म्हणजे भारतीय सौंदर्य असल्याचे चाहत्यांनी म्हटले.
कियारा ही फक्त शॉर्ट आणि वेस्टर्न ड्रेसेसमध्येच नव्हे तर अॅथनिक आणि ट्रॅडिशनल अटायरमध्येदेखील अप्सरा दिसते.
कियाराने याआधीदेखील साडीमधील फोटो शेअर केले होते. त्यावेळीदेखील चाहते तिच्या सौंदर्याने घायाळ झाले होते.
साडीमध्ये कियारा फक्त सुंदरच नव्हे तर ती कम्फर्टेबल दिसते. प्रत्येक वेळी स्टायलिश आणि स्लीवलेस ब्लाउस परिधान करते. यामुळे आणखी ग्लॅमरस दिसते.
कियारा आडवाणी ही अभिनयासोबत स्टायलिश लूक आणि कमालीच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.