बॉलिवूडचा जलवा, साऊथचा तडका, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारे 'हे' भन्नाट चित्रपट माहिती आहेत का?

प्रसिद्ध अभिनेत्री कियारी अडवाणी तसेच रामचरण यांची जोडी 'गेमचेंजर' या चित्रपटात बघायला मिळणार आहे. लवकरच गेमचेंजर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सिनेस्टार रामचरण तसेच हिंदीसिनेसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री कियारी अडवाणी यांची जोडी दिसणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
'छावा:द ग्रेट वॉरियर'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका तसेच विकी यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रश्मिका छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

. बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा यांच्या 'जवान' चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगला धुमाकूळ घातलेला दिसून आला.
आनंद एल. राय दिग्दर्शित 'रांझना' हा चित्रपट 21 जून 2013 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर यांची जोडी दिसली होती. या चित्रपटातील 'तुम तक', 'बनारसिया' ही गाणी प्रसिद्ध झाले होती.
अभिनेता रणबीर तसेच अभिनेत्री रश्मिका यांच्या अलिकेडच प्रदर्शित झालेल्या 'अॅनिमल' चित्रपटाने तगडी कमाई केली आहे. या चित्रपटाच्या रुपाने बॉलिवूड- साऊथ सिनेतारकांचा मेळ पाहायला मिळाला.