Amitabh Bachchan Bunglow : मुंबईपासून दुबईपर्यंत जगभरात अनेक ठिकाणी 'बिग बीं' चे आलिशान बंगले
90च्या दशकात अमिताभ बच्चनने दु:खी आत्मा म्हणून बॉलिवूडमध्ये आपली ओळख बनवली होती. आज बिग बी त्यांचा 79 वा वाढदिवस साजरा करत आहेत. अनेक वर्षांपासून अमिताभ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. फक्त अभिनयानेच नव्हे तर त्यांच्या व्यक्तिमत्वासाठी देखील ते लोकप्रिय आहेत. आजही चाहत्यांना खूश करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या अभिनयाने चाहत्यांना खूश करणाऱ्या अमिताभचे मुंबईत पाच बंगले आहेत. पण ते त्यांच्या कुटुंबियासोबत 'जलसा' बंगल्यावर राहतात. त्याच बंगल्यावरुन ते दर रविवारी चाहत्यांना भेटतात. हा बंगला मुंबईतील 'जुहू' मधला आहे.
अमिताभचा दुसरा बंगला 'प्रतीक्षा' आहे. 'जलसा' बंगल्यावर राहायला जाण्याआधी अमिताभ त्यांच्या आई-वडिलांसोबत 'प्रतीक्षा' बंगल्यावर राहत होते. अभिषेक आणि श्वेताने बालपणीचा काळ देखील याच बंगल्यात घालवला आहे. तर अभिषेक बच्चनचे लग्न देखील याच बंगल्यात झाले होते.
बिग बींच्या तिसऱ्या बंगल्याचे नाव 'जनक' आहे. या बंगल्यात 'सरस्वती पिक्चर्स' या त्यांच्या निर्मिती संस्थेचे ऑफिसदेखील याच बंगल्यात आहे. हा बंगला त्यांनी 2004 साली विकत घेतला होता.
'वत्स' हा बिग बींचा चौथा बंगला आहे. हा बंगला जुहूमध्ये आहे. हा बंगला सिटी बॅंक इंडियाला भाड्याने देण्यात आला आहे.
2013 सालात अमिताभने 'जलसा' बंगल्यामागे 60 कोटी रुपयांचा एक बंगला विकत घेतला होता. हा बंगला सध्या भाड्याने देण्यात आला आहे. हा बंगला पाहण्यासाठी जगभरातून लोकं येत असतात.
2016 मध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चनने दुबईत एक बंगला विकत घेतला आहे. हा सगळ्यात महागडा बंगला आहे. या बंगल्यात सगळ्या लक्झरी सुविधा आहेत.