Alia Bhatt : नववधू बनणाऱ्या आलियाच्या बालपणाची झलक, क्यूट फोटोंवर एक नजर
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या रणबीर कपूरसोबतच्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. पण यासोबतच ती तिच्या अभिनय आणि क्यूट लूकसाठीही खूप प्रसिद्ध आहे. सध्या सोशल मीडिया आलिया आणि रणबीरच्या बातम्या पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत चाहत्यांनाही त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आलियाच्या बालपणीची झलक दाखवणार आहोत. हे फोटो पाहून प्रत्येकजण तिचा क्यूटनेस आणि निरागसपणा पाहून भारावून जाईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआलिया आता एक यशस्वी अभिनेत्री झाली असली तरी तिच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा आजही कायम आहे.
आलिया भट्ट ही ज्येष्ठ निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट्ट आणि त्यांची दुसरी पत्नी सोनी राजदान यांची मुलगी आहे.
आलिया लहानपणापासून खूप क्यूट आहे आणि ती हुबेहुन तिची आई सोनी राजदान सारखी दिसते.
चाहते नेहमीच आलियाच्या फोटोंवर भरपूर लाइक्स शेअर करतात. तिचा प्रत्येक लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतो.
आलिया भट्टने 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच सिनेमापासून तिने इंडस्ट्रीत ओळख निर्माण केली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही.