Akshay Kumar : अक्षय कुमारला पहिल्या सिनेमाचं मानधन किती मिळालं होतं? जाणून घ्या...

Akshay Kumar : कोट्यवधींचं मानधन घेणाऱ्या अक्षय कुमारची पहिली कमाई 50 हजार होती.

Akshay Kumar

1/10
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
2/10
अक्षय कुमारची गणना बॉलिवूडच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये केली जाते.
3/10
आज खिलाडी कुमार एका सिनेमासाठी कोट्यवधींचं मानधन घेत असला तरी त्याची पहिली कमाई किती होती याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
4/10
खिलाडी कुमारने नुकतच एका मुलाखतीत त्याच्या पहिल्या कमाईबद्दल भाष्य केलं आहे.
5/10
अक्षयचा 'सौगंध' हा सिनेमा आधी प्रेक्षकांच्या भेटीला आला असला तरी 'दीदार' या सिनेमाने त्याला पहिला ब्रेक दिला.
6/10
'दीदार' या सिनेमासाठी अक्षयने 50 हजार रुपये मानधन घेतलं होतं. तर 'सौगंध' या सिनेमासाठी अक्षयला 75 हजार रुपये मिळाले होते.
7/10
अक्षय कुमारचे अनेक सिनेमे सुपरहिट झाले असले तरी त्याचे काही सिनेमे मात्र सुपरफ्लॉप झाले आहेत.
8/10
अक्षय कुमारचा 'सेल्फी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
9/10
'सेल्फी'नंतर खिलाडी आता 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
10/10
कोट्यवधींचं मानधन घेणाऱ्या अक्षय कुमारची पहिली कमाई 50 हजार होती.
Sponsored Links by Taboola