पाकिस्तानचा हाईएस्ट पेड एक्टर, पण बॉलिवूडमध्ये बसला नाही जम, काहीच चित्रपट करून झाला गायब; ओळखलंत का कोण?
काहीच बॉलिवूडपट करुन गायब झालेल्या पाकिस्तानी हँडसम आणि मोस्ट पॉप्युलर मॉडल अॅक्टरचं नाव आहे फवाद खान. ज्याला आपली बॉलिवूड फिल्म 'खूबसूरत'मुळे वेगळी ओळख मिळाली. पण, तीन फिल्म्सनंतर अचानक फवादनं बॉलिवूडमधून काढता पाय घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज, 29 नोव्हेंबर रोजी फवाद आपला 43 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. अशातच आम्ही तुम्हाला त्याच्या लाईफबाबत काही गोष्टी सांगत आहोत.
फवादचं पूर्ण नाव फवाद अफजल खान... त्याचा जन्म पाकिस्तानातील कराचीत झाला. फवादनं करिअर म्हणून मॉलिंग करण्याचा निर्णय घेतला.
मॉडलिंगमध्ये जम बसल्यानंतर फवादनं पाकिस्तानी टेलिव्हिजन शोमध्ये पाऊल ठेवलं. फक्त आणि फक्त वयाच्या 19 व्या वर्षी फवादनं टेलिव्हिजन शो 'जट एंड बॉन्ड'मध्ये एका स्पॉट बॉयची भूमिका साकारलेली.
त्यानंतर अभिनेता 'खुदा' चित्रपटातही दिसून आला होता. पण, त्यानंतर फवाद पुन्हा छोट्या पडद्याकडे परतला. तेच पाकिस्तानात नाव कमावल्यानंतर फवादनं आपली पावलं बॉलिवूडकडे वळवली. सोनम कपूरसोबत 'खूबसूरत'मध्ये स्क्रिन शेअर केली. हा फवादचा बॉलिवूड डेब्यू होता.
त्यानंतर त्यानं 'कपूर एंड संस' आणि 'ऐ दिल है मुश्किल' सारखे गाजलेले चित्रपट केले. पण त्यानंतर तो बॉलिवूडमधून गायब झाला. खरं तर महत्त्वाची बाब म्हणजे, फवाद खाननं आपल्या मर्जीनं नाहीतर त्याच्यावर बंदी घातल्यामुळे बॉलिवूडमधून काढता पाय घेतला.
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. याच कारणामुळे फवाद पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करू शकला नाही.
फवाद खान एक उत्तम अभिनेता तर आहेच, पण तो खूप शिकलेला देखील आहे. त्यांनं कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. त्याचं खरं स्वप्न रॉनोटिक इंजिनिअर बनण्याचं आहे.
दरम्यान, फवाद काही चित्रपटांनंतर बॉलिवूडमध्ये काम करू शकला नाही. पण तो पाकिस्तानी इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फवाद खान लवकरच बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे.