Lakme Fashion Week मध्ये अभिनेत्रींचा जलवा; मराठमोळा साज ते बोल्ड अंदाज
लॅक्मे फॅशन वीकमध्ये 'मेड इन हेवन' फेम शोभिता धुलिपाला लक्षवेधी ठरली. मनमोहक अदांनी तिने चाहत्यांना घायाळ केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलॅक्मे फॅशन वीकमध्ये हिना खानने जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. हिनाची साडी साधी असली तरी खूपच सुंदर होती. या साडीत हिना स्टाइलिश आणि कॉन्फिडंट दिसत होती.
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेंच्या गुलाबी रंगाची छटा असलेल्या स्टाइलिश आउटफिटने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. यात सोनाली खूपच ग्लॅमरस दिसत होती.
चित्रांगदा सिंहची तुलना अनेकदा स्मिता पाटीलसोबत केली जाते. लॅक्मे फॅशन वीकमध्ये तिचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला.
लॅक्मे फॅशन वीकमध्ये संजना संघीचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला. संजनाने तिचे मराठमोळ्या लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रिया चक्रवर्तीची फॅशन तिचे चाहते अनेकदा फॉलो करताना दिसतात. रिया नुकतीच लॅक्मे फॅशन वीकमध्ये स्पॉट झाली आहे. दरम्यान रियाने तिच्या लुकने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
लॅक्मे फॅशन वीकमधला अभिनेत्री यामी गौतमचा मनमोहक लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला.
कृती सेनन सध्या तिला लक्षवेधी लुकमुळे चर्चेत आहे. 'लॅक्मे फॅशन वीक'च्या मंचावर कृती फॅशन डिझायनर शंतनु आणि निखिलचं प्रतिनिधित्व करताना दिसून आली.
मलायका अरोरा तिच्या हॉटनेटमुळे नेहमीच चर्चेत असते. लॅक्मे फॅशन वीकमध्ये मलायका अनेक तरुण अभिनेत्रींना टक्कर देताना दिसून आली.
रितेश आणि जेनेलियाची जोडी बॉलिवूडच्या बहुचर्चित जोडींपैकी एक आहे. नुकतेच दोघेही फिकट गुलांबी रंगाच्या पेहरावात दिसून आले आहेत. मैचिंग आऊटफिटमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत होते.