Vidya Balan : विद्या बालनचं साडी प्रेम... या रुपात अधिक खुलतं विद्याचं सौंदर्य
लोक काय म्हणतील याची पर्वा न करणारी विद्या बालन आज खूप सुंदर आयुष्य जगत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविद्या बालनला सुरुवातील दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत एक मल्याळम चित्रपट मिळाला होता.
विद्याने 'हम पाँच' या टीव्ही मालिकेत नशीब आजमावले. यानंतर तिने छोट्या पडद्यावरील अनेक जाहिरातींमध्ये काम केले.
यातील बहुतांश जाहिराती प्रदीप सरकार यांनी दिग्दर्शित केल्या होत्या. विद्या प्रदीप सरकार यांना दादा म्हणायची.
यादरम्यान विद्याने विनोद चोप्राच्या आगामी 'परिणीता' चित्रपटासाठी ऑडिशन दिले.
'परिणिता' या चित्रपटासाठी विद्याला 60 हून अधिक स्क्रीन टेस्ट द्याव्या लागल्या होत्या.
2005 मध्ये आलेल्या 'परिणिता' या चित्रपटाने विद्या बालनचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. 13 वर्षांच्या कारकिर्दीत विद्याने बॉलिवूडमध्ये आपली पकड मजबूत केली. 'भूल भुलैया' चित्रपटापासून ते 'द डर्टी पिक्चर'मधील बोल्ड कॅरेक्टर ते 'कहानी', जलसामधील दमदार अभिनयानं विद्यानं वेगळी छाप सोडली आहे.
विद्या बालनचं साडी प्रेम सर्वांना माहितीच आहे. साडीमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं.