एकेकाळी तिला कुत्र्याने रिप्लेस केलं, पण आज तीच अभिनेत्री झाली 3010 कोटींच्या साम्राज्याची मालकीण!

Bollywood actress : सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणे म्हणजे सोपी गोष्ट राहिलेली नाही. प्रत्येकाला इथं स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
काही जणांना सुरुवातीपासूनचं यश मिळू लागत तर काही जणांना मोठ्या संघर्षानंतर यश मिळतं. काही वेळेस टॅलेंट असूनही संधी अभावी कलाकार पुढे जाऊ शकत नाहीत. सौंदर्यावरुन जज केलं जातं असल्याची अनेक कलाकारांची तक्रार देखील असते.

अशा अनेक समस्यांचा आणि संघर्षाचा सामना करत एक अभिनेत्री आता 3010 कोटींच्या साम्राज्याची मालकीण बनलीये. ज्या अभिनेत्रीला कुत्र्याने रिप्लेस केलं, ती आज 3010 कोटींचं साम्राज्य असलेल्या घराण्याची सून झालीये.
अभिनेत्री स्वत:कडे काहीच सौंदर्य नाही, असं समजायची. तिने विचार देखील केला नव्हता की ती कधीतरी बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण करेल. कॉलेजमध्ये असताना तिच्या मित्रांनी एक ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी सांगितलं होतं.
मात्र, त्यावेळी तिला वाटलं की मी यात यशस्वी होऊ शकणार नाही. मात्र, ती हिंमतीने या ऑडिशला सामोरं गेली. मात्र, त्यावेळी तिला अेक वाईट टिप्पणींचा सामना करावा लागला. खास दिसत नाही, असं म्हणत तिला रिजेक्ट करण्यात आलं होतं. मात्र, आता तिनं इंडस्ट्रित मोठं नाव केलंय.
32 वर्षीय शोभिता धुलिपाला बॉलिवूडमधील सर्वात टॉपची अभिनेत्रींपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, एका ऑडिशनवेळी तिला अपमानित करण्यात आलं होतं. तिच्या जागी एका जाहिरातीमध्ये कुत्र्याला कास्ट करण्यात आलं होतं. मात्र, या सर्व वाईट गोष्टींना सामोरे जात तिने वेगळं नाव स्वत:चं वेगळं नाव निर्माण केलं.
शोभिता धुलिपाला हिचा जन्म 31 मे 1992 मध्ये विशाखापट्टनमध्ये झालाय. तिचे वडिल मर्चेंट नेव्हीमध्ये इंजिनिअर होते. तिचं बालपण अतिशय साधारण राहिलं होतं. मात्र, तिला लहाणपणापासून डान्समध्ये इंटरेस्ट होतं. तिने भरतनाट्यम आणि कुचिपुड़ी सारखे शास्त्रीय नृत्य प्रकार देखील शिकले होते. शोभिताने मुंबई विद्यापीठातून एचआर बिझनेस आणि अर्थशास्त्रामध्ये डिग्री मिळवली. त्यानंतर तिने मॉडलिंग आणि अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आणि ऑडिशन देखील दिल्या.
दरम्यान शोभिता धुलिपाला हिने साऊथचा सुपरस्टार अभिनेता नागा चैतन्यशी विवाह केलाय. चैतन्यच्या घराण्याकडे मोठी संपत्ती आहे. शिवाय चैतन्यच्या वैयक्तिक संपत्तीचा विचार केला तर ती 154 कोटींची आहे.
शोभिताने तिच्या करियरची सुरुवात मॉडलिंगमधून केली. 2013 मधील फेमिना मिस इंडिया या स्पर्धेत ती उपविजेती ठरली होती. त्यानंतर तिने दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या 'रमन राघव 2.0' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
त्यानंतर तिने गुडाचारी , मेड इन हेवन, मूथोन , कुरुप आणि पोन्नियिन सेलवन यांसारख्या सिनेमात आणि वेब सिरीजमध्ये काम केलंय.