अभिनेत्री मृणाल ठाकूरलाही करावा लागला होता 'बॉडी शेमिंग'चा सामना
अनेक कलाकारांना ट्रोलर्स त्यांच्या फॅशन आणि फिगरवरून ट्रोल करत असतात. काही सेलिब्रिटी या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देतात. अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor), मलायका अरोरा (Malaika Arora), पलक तिवारी (Palak Tiwari), अनेरी वजानी (Aneri Vajani) या अभिनेत्रींना त्यांच्या फिटनेसमुळे अनेक वेळा ट्रोल करण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये मृणाल ठाकूरनं (Mrunal Thakur) बॉडी शेमिंगबाबत सांगितलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुलाखतीमध्ये मृणालनं सांगितलं, ट्रोलर्स तिची फिगर पाहून तिला 'मटका' असं म्हणत होते.
ट्रोलर्स आणि बॉडी शेमिंगबाबत मृणाल म्हणाली, 'ट्रोलर्स माझ्या कर्वी फिगरमुळे मला ट्रोल करत होते.
जेव्हा मी वजन कमी करायला सुरूवात करते तेव्हा मी पहिल्यांदा चेहऱ्याचं वजन कमी करते. त्यानंतर शरीराच्या वरच्या भागाचे वजन कमी करते. मग खालच्या भागाचे वजन कमी करते. माझ्या शरीराचा आकार असाच आहे, असं तिने सांगितले.
ट्रोलर्समुळे माझ्यातीलआत्मविश्वास कमी झाला होता. पण लोक मला मटका म्हणत होते, या गोष्टीचं मला वाईट वाटतं नव्हतं त्याबद्दल मला अभिमान वाटतो.
झिरो फिगर असणं गरजेचं नाहिये. फिट आणि निरोगी राहणं गरजेचं असल्याचे तिने सांगितले.
मृणालचा जर्सीचा हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटामधील मृणाल आणि शाहिदच्या केमिस्ट्राला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
मृणाल ठाकूरने याआधी बाटला हाऊस, सुपर 30, घोस्ट स्टोरीज, धमाका आदी हिंदी चित्रपटात साकारलेल्या भूमिकांचे कौतुक झाले आहे. त्याशिवाय, विट्टी-दांडू आणि सुराज्य या मराठी चित्रपटातही ती झळकली आहे.