Varun Dhawan Wedding | वरुण- नताशाच्या लग्नासाठी 'या' सेलिब्रिटी फॅशन डिझायनरला पसंती

नातेवाईकांप्रमाणंच आता वरुण आणि नताशा त्यांच्या बहुप्रतिक्षित विवाहसोहळ्यासाठी कोणत्या पेहरावाला पसंती देतात हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वरुण आणि नताशाच्या विवाहसोहळ्यासाठी आता कुटुंबीयही तयारीला लागले आहे. एखाद्या घरात ज्याप्रमाणं लगीनघाई दिसून येते, त्याचप्रमाणं वरुण आणि नताशाच्या घरीही या समारंभासाठी उत्साह पाहायला मिळत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार अलिबागमध्ये ही जोडी मोजक्या उपस्थितांच्या साक्षीनं लग्नगाठ बांधणार आहे.
वरुणच्या कुटुंबानं त्यांनी ही निवड अगदी स्पष्ट ठेवली असल्याचं कळत आहे. कारण, नुकतंच त्यांना सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांच्या स्टोअरमध्ये पाहायला मिळालं.
वरुणाचा भाऊ रोहित धवन, वहिनी जान्हवी धवन हे त्यांच्या मुलीसह इथे दिसले. यावेळी ते लग्नाच्याच खरेदीसाठी इथं आल्याची माहिती समोर आली.
सेलिब्रिटी कपलचा विवाहसोहळा म्हटलं की, त्यासाठी कोणत्या सेलिब्रिटी फॅशन डिझायनरला पसंती दिली जाणार याबाबतही चाहत्यांना कुतूहल असतं.
अभिनेता वरुण धवन (varun dhawan) आणि त्याची प्रेयसी नताशा दलाल यांचा विवाहसोहळा अखेर पार पडणार आहे. बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ही जोडी अखेर एका नव्या आयुष्याची सुरुवात करण्यास सज्ज झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -