'प्यार किया तो डरना क्या'... 'या' सेलिब्रिटींनी कुटुंबाच्या इच्छेविरोधात जाऊन बांधली लग्नगाठ
सेलिब्रिटींच्या लव्ह लाइफबद्दल जाणून घेण्यासाठी अनेक लोक उत्सुक असतात. जाणून घेऊयात असे काही कलाकार ज्यांनी कुटुंबाच्या परवानगीशिवाय लग्न करण्याचा निर्णय घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूडमधील शम्मी कपूर आणि गीता बाली हे रोमॅंटिक कपल म्हणून ओळखले जात होते. 1955 साली 'रंगीन रातें'ल चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान शम्मी कपूर यांनी गीता बाली यांना प्रपोज केले.
शम्मी कपूर यांच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. शम्मी यांनी 4 महिने घरच्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या कुुटुंबाने या लग्नाला परवानगी दिली नाही. त्यानंतर त्या दोघांनी कुटुंबाच्या इच्छे विरोधात लग्न करण्याचा निर्णय घेतला. शम्मी कपूर हे त्यांच्या लग्ना दिवशी सिंदूर आणायला विसरले होते. त्यावेळी गीता यांनी त्यांची लिप्सस्टिक शम्मी यांना दिली. ती लिप्सस्टिक सिंदूर म्हणून लावून शम्मी आणि गीता यांचा विवाह सोहळा पार पडला.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांची लव्ह स्टोरी अनेकांना माहित नसेल. आमिरच्या घराजवळच रीना दत्ता राहात होती. आमिर मुस्लिम आणि रीना हिंदू असल्याने दोघांच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. आमिर 21 वर्षाचा असताना आणि रीना 19 वर्षाची असताना दोघांनी घरच्यांचा इच्छे विरोधत लग्न केले होते.
2002 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 16 व्या वर्षी त्यांचे सेक्रेटरी गणपतराव भोसले यांच्या सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. सेक्रेटरी गणपतराव भोसले हे तेव्हा 31 वर्षाचे होते. कुटुंबाच्या इच्छे विरोध आशा यांनी गणपतराव यांच्यासोबत लग्न केले होते.
त्यानंतर 1980 मध्ये आशा भोसले यांनी आर डी बर्मन यांच्यासोबत लग्न केले.
मैंने प्यार किया या चित्रपटामधून विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री भाग्यश्रीची लव्ह लाइफ देखील हटके आहे. एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान भाग्यश्री हिमालय दासानी यांना भेटली. कुटुंबाचा भाग्यश्री आणि हिमालय यांच्या लग्नाला विरोध होता. पण भाग्यश्रीने हिमालय यांच्यासोबतच लग्नगाठ बांधली.