PHOTO : वाचा शहनाझचा फिटनेस फंडा!
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) मृत्यूनंतर शहनाज गिलला (Shehnaaz Gill) वाटले की, आपले संपूर्ण जगच संपले आहे. यानंतर तिने काम करणे बंद केले होते. तसेच, तिच्या चेहऱ्यावरील पूर्वीसारखे हास्य देखील नाहीसे झाले होते. आता अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या जुन्या आयुष्यात परतण्याचा प्रयत्न करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशहनाज शिल्पा शेट्टीच्या ‘शेप ऑफ यू’ या शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये ती वजन कमी करण्याच्या प्रवासाबाबतही मोकळेपणाने बोलली.
यावेळी शहनाजने ट्रेनरच्या मदतीशिवाय शहनाझने वजन कसं कमी केलं? याबद्दल सांगितलं. शहनाज गिलने सांगितले की, या प्रवासादरम्यान तिने तेच पदार्थ खाल्ले, जे ती पूर्वी खात होती.
डाएटबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली की, यादरम्यान तिने कोणताही वेगळा डाएट घेतलेला नाही. सकाळी ती चहा प्यायची, हळदीचे पाणी प्यायची. त्यानंतर शहनाज अॅपल सायडर व्हिनेगरचे पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करायची. तसेच, ती कधी कधी नाश्त्यात डोसा, मेथी पराठा खायची. शहनाज म्हणाली की, वजन कमी करण्यासाठी ती हाय प्रोटीन नाश्ता करायची. यावेळेत तिने फक्त तिने जेवण काहीसं कमी केलं होतं.
वेटलॉस जर्नीबद्दल सांगताना शहनाझ म्हणते, बाहेर फिरायला जाऊ शकत नसाल, तर घरीच फिरा. तुम्ही तुम्हाला जे हवं ते करू शकता. सलवार सूटमध्येही तुम्ही फिट दिसू शकता.