Smart Jodi Winner: अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी पटकावला स्मार्ट जोडीचा किताब!
छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो 'स्मार्ट जोडी'ला अखेर विजेतेपद मिळाले आहे. फेब्रुवारीपासून सुरू झालेला हा शो टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी जिंकला आहे.(photo:lokhandeankita/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App10 सुंदर जोडप्यांसह सुरू झालेल्या या शोमध्ये सर्व स्टार्सनी आपापल्या बाजूने खूप मेहनत घेतली, परंतु अंकिता आणि विकीने सगळ्यांना टक्कर देत विजेतेपद पटकावले.(photo:lokhandeankita/ig)
शेवटी अंकिता-विकी आणि बलराज सियाल-दीप्ती या जोडीमध्ये टक्कर झाली. मात्र, आता अंकिता-विकीने सगळ्यांना मागे टाकत आपलं नाव कोरलं आहे.(photo:lokhandeankita/ig)
आता त्याला शोच्या ट्रॉफीसह बक्षिसाची मोठी रक्कम मिळाली आहे. वास्तविक, दोघांनाही २५ लाख रुपये रोख देण्यात आले आहेत.(photo:lokhandeankita/ig)
शोच्या फिनाले एपिसोडमध्ये, रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांची जोडी, ज्यांना बॉलीवूडच्या परफेक्ट कपल्सपैकी एक म्हटले जाते, त्यांनी येथे हजेरी लावली होती. या व्यतिरिक्त प्रसिद्ध गायक कुमार सानू देखील या एपिसोडमध्ये फिनालेचा भाग बनले होते. (photo:lokhandeankita/ig)
नुकताच या दोघांनी त्यांच्या लग्नाचा 4 महिन्यांचा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी दोघांना शोचे विजेते घोषित करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आता अंकिता-विकीसाठी हा प्रसंग दुहेरी पर्वणी ठरला आहे.(photo:lokhandeankita/ig)