Amruta khanvilkar : चंद्रमुखीच्या घरचा बाप्पा पाहिलात का?

गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार असल्याने मोठा जल्लोष होताना दिसत आहे.

गणेशोत्सवासाठी भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. अनेक कलाकार मंडळीही गणेशोत्सव साजरा करताना दिसत आहे.
‘चंद्रा’ फेम अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नुकतेच सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री अमृता खानविलकरच्या घरीही बाप्पांचं आगमन झालंय.
त्याची झलक तिने सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.
अमृताने गणेशाची ही मूर्ती स्वतःच्या हाताने तयार केली आहे.
त्याचा व्हिडियोही तिने शेअर केला होता. अमृताने फार सुंदर बाप्पाची आरास केली आहे.
फोटोमध्ये अमृता पांढऱ्या साडीमध्ये नटलेली दिसत आहे.
बाप्पांची पूजा करतानाचे अमृताचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.