PHOTO: गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजेची लाली... पाहा पाठकबाईंच्या मेहेंदीसोहळ्याचे खास क्षण!
तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर (Akshaya Deodhar) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही दिवसांत त्याच्या लगीनघाईचे फोटो समोर येत होते. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती.
हार्दिक आणि अक्षयाच्या मेहंदी सोहळ्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या मेहेंदी सोहळ्यात अक्षया फारच सुंदर दिसत आहे. कलरफुल लेहेंगा परिधान करून तिने फोटोशूट केलं आहे.
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर येत्या 1 किंवा 2 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
तसेच त्यांचे लग्न पुण्यात होणार असल्याचेदेखील म्हटले जात आहे.
हार्दिक आणि अक्षयाने 3 मे 2022 रोजी दणक्यात साखरपुडा उरकला आणि तेव्हापासून चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती.
अत्यंत पारंपरिक पद्धतीने ते लग्न करणार आहेत. मनोरंजनसृष्टीतील अनेक मंडळींच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.
शरीराने दणकट असलेला परंतु मनाने साधा भोळा असणारा पहिलवान राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेल्या अंजली बाईंची प्रेमकथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होती.
आता वैयक्तिक आयुष्यात ते सार फेरे घेणार असल्याने चाहते आनंदीत झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.