Rinku Rajguru : गुलाबी साडी आणि.. अभिनेत्री रिंकू राजगुरूचा नवा लूक चर्चेत!
'सैराट' (Sairat) फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरिंकू राजगुरू सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा ती प्रयत्न करत असते.
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटाच्या माध्यमातून रिंकूने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं.
उत्कृष्ट अभिनय आणि हसरा चेहरा, सौंदर्याच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे.
आता अभिनेत्रीचे आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे.
रिंकू राजगुरूचं खरं नाव प्रेरणा असं आहे. 'सैराट' या चित्रपटाने तिला रातोरात सुपरस्टार केलं.
या चित्रपटातील तिचा अभिनय चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला होता. 'सैराट'सह रिंकूने कागर, मेकअप, झुंड, झिम्मा 2 या सुपरहिट चित्रपटांतही काम केलं.
रिंकूने तिचा नवा लूक शेअर केला आहे. ज्यात तिने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.
रिंकूच्या या साध्या लूकवर चाहते फिदा झाले आहेत. (pc:iamrinkurajguru/ig)