Jennifer Winget : पतीला गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं, प्रेमात मिळालेल्या धोक्यामुळे ही अभिनेत्री अजूनही सिंगल
जेनिफर विंगेटने 'दिल मिल गये', 'बेहद', 'कहीं तो होगा' आणि 'बेपन्ना' सारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेनिफरची प्रोफेशनल लाईफ खूप चांगली राहिली आहे. पण, तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र खूप दुःखाचा सामना करावा लागला आहे.
जेनिफर विंगेटने आयुष्यातील कठीण काळात कधीही हार मानली नाही.आज जेनिफर ही सर्वाधिक कमाई करणाऱ्या टीव्ही मालिका अभिनेत्रीपैकी एक आहे.
टीव्ही शोच्या सेटवरच करण सिंग ग्रोव्हरसोबत तिची भेट झाली होती. त्यानंतर अभिनेत्रीने तिच्या नात्याला नाव दिले होते. मात्र, त्यांचे नाते वर्षभरही टिकले नाही आणि करण-जेनिफर एकमेकांपासून वेगळे झाले.
जेनिफरने करण सिंग ग्रोव्हरला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडले होते, अशी चर्चा होती. यानंतर अभिनेत्रीने सर्वांसमोर करणच्या कानशिलातही लगावली. पतीकडून फसवणूक झाल्याने जेनिफर खूपच तुटली होती.
त्यानंतर जेनिफर आणि करणने 10 महिन्याच्या आत घटस्फोट घेतला. करणने धोका दिल्यानंतर जेनिफिरच्या आयुष्यात दुसरा कोणी आला नाही. सध्या जेनफिर ही सिंगल आहे
सिद्धार्थ काननसोबत तिच्या घटस्फोटाबाबत बोलताना जेनिफर विंगेट म्हणाली होती की, 'त्यावेळी मी धक्क्यात होती, की लोकांना काय सांगावे आणि त्यावर कसे वागावे हेच कळत नव्हते. मला आठवते की माझे मित्र मला बाहेर जाण्यास भाग पाडत होते. जेणेकरून मी या धक्क्यातून बाहेर पडावी. पण तसे मला कधी वाटले नाही. मला बाहेर कुठं जाण्याची इच्छाच राहिली नाही.
जेनिफर विंगेटला टीव्हीची राणी म्हटले जाते. इंस्टाग्रामवर त्याचे 18.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. आज ती सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टीव्ही अभिनेत्रींपैकी एक आहे.
जेनिफर एका एपिसोडसाठी 1.5 लाख रुपये घेते आणि तिची एकूण संपत्ती 42 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.