PHOTO: अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदाच्या अडचणीत मोठी वाढ!
अभिनेत्री आणि माजी खासजार जया प्रदा (Jaya Prada) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.(photo:jayapradaofficial/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाने त्यांना फरार घोषित केलं आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. (photo:jayapradaofficial/ig)
जया प्रदा या मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आपल्या दर्जेदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. राजकारणातही त्या चांगल्याच सक्रिय आहेत. (photo:jayapradaofficial/ig)
पण आता मात्र त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं समोर आलं आहे. न्यायालयाने त्यांना फरार घोषित केलं आहे. त्यांना अटक करण्यासाठी खास टीम तयार करण्यात आली आहे. न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिले आहेत.(photo:jayapradaofficial/ig)
उत्तरप्रदेश आणि मुंबईला त्यांची टीम रवाना झाली आहे. काही ठिकाणी जया प्रदा यांना अटक करण्यासाठी छापेमारीदेखील सुरू आहे.(photo:jayapradaofficial/ig)
जया प्रदा यांच्याविरोधात न्यायालयाने कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 2019 मधील प्रकरणामुळे जया प्रदा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जया प्रदा यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवली होती. (photo:jayapradaofficial/ig)
आचार संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी अनेकदा त्यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. अनेकदा आदेश जेऊनही त्या न्यायालयात उपस्थित राहिलेल्या नाहीत.(photo:jayapradaofficial/ig)
जया प्रदा यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील रामपूरात भाजपने उमेदवारी दिली होती. (photo:jayapradaofficial/ig)
पण या निवडणुरीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2019 मध्ये जयाप्रदा रामूरला परतल्या आणि भाजपने त्यांना उमेदवारी दिली. मात्र, यावेळीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.(photo:jayapradaofficial/ig)
स्वार पोलीस ठाण्याने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जया प्रदा यांनी आचार संहितेचं उल्लंघन केलं आहे. त्यावेळी आचार संहिता लागू असताना त्यांनी एका रस्त्याचं उद्घाटन केलं होतं. (photo:jayapradaofficial/ig)
तसेच केमरी भागातील एका गावात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. या दोन्ही प्रकरणाची सुनावनी एमपी-एमएलए स्पेशल न्यायालयात सुरू आहे. अभिनेत्रीवर सातव्यांदा अजामीनपत्र वॉरंट जारी केले आहे. (photo:jayapradaofficial/ig)