अभिनेता स्वप्नील जोशी कुंभमेळ्यात, गंगेत डुबकी; दैवी आशीर्वाद म्हणत डोळ्यात आनंदाश्रू

देशभरात प्रयागराज येथील कुंभमेळ्याची चर्चा असून देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक कुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी जात आहेत.

Swapnil joshi break down in kumbhmela prayagraj

1/7
देशभरात प्रयागराज येथील कुंभमेळ्याची चर्चा असून देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक कुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी जात आहेत. त्यामध्ये, अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वसामान्य नागरिक व सेलिब्रिटींचाही उत्साह दिसून येत आहे.
2/7
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता आणि निर्माता स्वप्नील जोशी देखील महाकुंभ मेळ्यात पोहोचला असून त्याने आपल्या मित्रांसमवेत पवित्र स्नान केलं. महाकुंभ मेळ्यात स्नान करणं हा दैवी आशीर्वाद असल्याचे स्वप्नील जोशीने म्हटलं आहे.
3/7
प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभ मेळा भारतासह जगभरातील लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरतोय आणि जगभरातील भक्तांनी या महा कुंभ मेळ्यात खास हजेरी देखील लावली आहे.
4/7
हिंदू धर्मात पवित्र मनाला जाणाऱ्या महाकुंभ मेळ्यात निर्माता अभिनेता स्वप्नील जोशीने जाऊन पवित्र स्नान करून आशीर्वाद घेतेले आहेत. स्वप्नील हा कायम वेगेवगळ्या देव स्थांनाना भेट देताना दिसतो.
5/7
प्रयागराजमधील त्रिवेणी संगम इथे जाऊन स्वप्नीलने खास स्नान तर केलं पण भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या या सोहळ्याची झलक त्याने व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केली आहे.
6/7
स्वप्नील हा खास अनुभव शेयर करत म्हणतो, "2025 मधला सगळ्यात अविस्मरणीय अनुभव आहे. महाकुंभ मेळ्यात उपस्थित राहून पवित्र स्नान करण्याचा योग आला.
7/7
खूप सकारात्मक ऊर्जा अनुभवून डोळ्यातून आपसूक आनंदअश्रू आले, या अद्भुत संगमाचे साक्षीदार होणं दैवी आशीर्वाद वाटतो", असे स्वप्नीलने म्हटलं आहे. दरम्यान, स्वप्नील कायम चर्चेत राहणारा अभिनेता असला तरी त्याची अध्यात्मिक बाजू देखील तितकीच खास आहे.
Sponsored Links by Taboola