Vidhan Sabha Elections : विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात महाविकास आघाडी जोमात, महायुतीची चिंता वाढली; सर्वेक्षणातून धक्कादायक निष्कर्ष!
Maharashtra Assembly Elections 2024: लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात महाविकास आघाडीनं बाजी मारली. याच पार्श्वभूमीवर राज्यात आता आगामी विधानसभा निवडणूकही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच दिसणार आहे.
Maharashtra Assembly Elections 2024
1/9
लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीनंतर आता महायुतीनं विधानसभेसाठी झपाट्यानं काम करण्यास सुरुवात केली आहे.
2/9
येत्या काही महिन्यांत राज्यांत विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या सरकारपुढे आव्हानं कमी नाहीत.
3/9
ऑगस्ट महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात महाविकास आघाडीनं घट्ट पकड मिळवली आहे.
4/9
महायुतीनं मुंबई महानदर प्रदेशात (एमएमआर ठाणे आणि कोकण) पकड मजबूत केली आहे.
5/9
विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात महायुती कमकुवत होणं ही चिंतेची बाब म्हणून पाहिली जात आहे, कारण या पट्ट्यात विधानसभेच्या 170 जागा आहेत. महायुतीला 123 तर महाविकास आघाडीला 152 जागा मिळू शकतात, असा अंदाज सर्वेक्षणातून समोर आला आहे. असं झालं तर, महायुतीला बसलेला हा मोठा धक्का असेल.
6/9
या सर्वेक्षणात सहभागी असलेले ज्येष्ठ सेफॉलॉजिस्ट दयानंद नेने म्हणाले की, भाजपनं गेल्या 10 वर्षांत विदर्भात चांगली कामगिरी केली आहे, मात्र यावेळी विदर्भात काँग्रेसची लाट असल्याचं दिसतंय. सोयाबीन आणि कापूस पिकवणारे शेतकरी सरकारवर नाराज आहेत. त्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळाली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
7/9
मराठवाड्यात भाजपसाठी हा मार्ग सोपा नाही. मनोज जरंगे पाटील यांच्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. येथे विधानसभेच्या 46 जागा आहेत. अशा परिस्थितीत महायुतीनं जोरदार निवडणूक लढवली नाही, तर त्यांना पुन्हा सत्तेत येणं अवघड होणार आहे.
8/9
2019 च्या निवडणुकीत मराठवाड्यात भाजपला 16 जागा मिळाल्या होत्या. तर 2019 मध्ये भाजपनं 15 जागा जिंकल्या होत्या.
9/9
पश्चिम महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर पुण्यात भाजपची ताकद आहे. मात्र, बारामती, सातारा, सोलापूरमध्ये पक्ष कमकुवत आहे. अशा परिस्थितीत भाजपसाठी हेही मोठं आव्हान आहे. भाजपला सत्तेत परतायचं असेल तर त्यांना तिन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करावी लागेल.
Published at : 04 Sep 2024 08:36 AM (IST)