Lok Sabha Election Results 2024 : मुंबईत ठाकरेंची मशाल पेटली; उमेदवारांचा दणदणीत विजय, मुंबईचे नवे खासदार कोण? पाहा
दक्षिण मुंबईचा गड ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांनी राखला आहे. शिंदे गटाच्या यामिनी जाधव पराभूत झाल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवायव्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर 2 हजार मतांनी विजयी झाले आहेत. तर शिंदे गटाच्या रवींद्र वायकरांचा पराभव झाला आहे.
ईशान्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांचा दणदणीत विजय झाला आहे. तर भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा दारुण पराभव झाला आहे.
दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंचा पराभव झाला आहे.
उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत. तर भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला आहे.
उत्तर मुंबईत भाजपचे पियूष गोयल विजयी झाले आहेत, तर काँग्रेसच्या भूषण पाटील यांचा पराभव झाला आहे.