हिमाचल प्रदेशमध्ये सत्तांतर, काँग्रेसचा भाजपला धोबीपछाड
Himachal Pradesh Election Result 2022: गुजरातमध्ये दणदणीत विजय मिळवत भाजपनं (BJP) इतिहास रचलाय. पण हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh Result 2022) भाजपला सत्ता राखण्यात अपयश आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिमाचल प्रदेशमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवल्यानंतर देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष केला आहे.
फटाके उडवून कार्यकर्त्यांनी हिमाचल प्रदेशमधील विजय साजरा केला.
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसनं बहुमत मिळवलं आहे. काँग्रेसने 40 जागांवर बाजी मारली आहे तर भाजपला 25 जागांवर समाधान मानावं लागलेय
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला 43.9 टक्के मतं मिळाली आहेत तर भाजपला 43 टक्के मते मिळाली आहेत. आप पक्षाला 10.4 टक्के मते मिळाली आहेत.
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसनं एकहाती सत्ता स्थापन केली आहे. काँग्रेस पक्षाला विजयाचा आनंद आहे पण घोडोबाजाराची भिती कायम आहे.
हिमाचलमध्ये ऑपरेशन लोट्सची भिती काँग्रेसला आहे, त्यामुळे आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेय. छत्तीसगढचे मुख्यमंत्री बूपेश बघेल म्हणाले की, भाजप कोणत्याही स्तराला जावू शकते. त्यामुळे आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवावं लागेल.
हिमाचल प्रदेशमधील जनतेनं सत्ताबदलाची प्रथा कायम ठेवली आहे. पाच वर्षांनंतर काँग्रेस (Congress) पुन्हा सत्तेत आली आहे.
भाजपच्या पराभवानंतर मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Jairam Thakur) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.
दिल्ली, मुंबईसह देशभरात काँग्रेसनं विजयी जल्लोष केला.