PHOTO : पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडलेली पुस्तके लवकरच वितरित होणार, पाहा पहिली झलक
पाठ्यपुस्तकांना वह्यांची पान जोडून बालभारतीची पुस्तके तयार झाली असून लवकरच ही नवी कोरी पुस्तके शाळांमध्ये वितरित होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडलेल्या पुस्तकांची पहिली झलक 'एबीपी माझा' वर पाहता येणार आहे.
यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पानं जोडली जाणार आहेत.
पाठ्यपुस्तक निर्मिती करणाऱ्या बालभारतीने ही नवी कोरी पुस्तक तयार केली असून पाठ्यपुस्तकांमधील कविता, धडे, घटक यानंतर विद्यार्थ्यांना नोंदी करता याव्यात त्यासाठी पुस्तकांना वह्यांची पानं जोडली गेली आहेत.
'माझी नोंद' या सदराखाली विद्यार्थी शिक्षक शिकवत असताना किंवा पाठ समजून घेत असताना या वह्यांच्या जोडलेल्या पानांवर विद्यार्थ्यांना लिहिता येणार आहे.
विद्यार्थ्यांना आपल्या दप्तरांमध्ये प्रत्येक विषयासाठी वेगळी वही सोबत ठेवण्याची गरज नाही.
शिक्षक जे शिकवतील त्याच्या नोंदी आता याच पुस्तकाला जोडलेल्या पानांवर करायच्या आहेत.
15 जूनपासून शाळा सुरु होणार असून पहिल्या दिवसापासून ही पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असेल.