ड्रग्सच्या व्यसनाने या बॉलिवूड स्टार्सच्या करिअरवर परिणाम, संजय दत्तपासून रणबीर कपूरचा समावेश
अभिनेता संजय दत्तने 1993 बॉम्ब स्फोट प्रकरणातील शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगली आहे. मात्र संजय दत्तला 1982 साली ड्रग्स बाळगल्याप्रकरणीही अटक झाली होती, हे अनेकांना माहित नसेल. त्यानंतर संजय दत्त नशामुक्ती केंद्रात सुनील दत्त यांनी पाठवलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसूत्रांच्या माहितीनुसार रणबीर कपूरने एका मुलाखतीत कबूल केलं होतं की, शाळेत असताना त्याने ड्रग्स घेणे सुरु केलं होतं. त्यानंतर याचं व्यसन त्याला लागलं. मात्र आता रणबीर यातून बाहेर पडला आहे. मात्र आजही रणबीर चेन स्मोकर आहे.
स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतिक बब्बरलाही संजय दत्तप्रमाणे ड्रग्जचं व्यसन लागलं होतं. याबद्दल प्रतिकने स्वत: सांगितलं होतं. प्रतिकने कबूल केलं की 13 वर्षाचा असताना ड्रग्स घ्यायला सुरुवात केली होती.
रॅपर आणि सिंगर हनी सिंग आपल्या करिअरच्या उंचीवर होता. मात्र हनी सिंग त्यावेळी ड्रग्सच्या विळख्यात सापडला होता. या परिस्थितीतून बाहेर पडणे सोपं नव्हत असं हनी सिंगने सांगितलं. मात्र हनी सिंगला ड्रग्सचं व्यसन लागलं होतं हे त्याने थेट कबून केलं नाही. मात्र आता हनी सिंग यातून बाहेर पडला असून आपल्या करियरवर लक्ष देत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार 5 मे 2001 रोजी फरदीन खानला कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक झाली होती. त्यावेळी फरदीनला 5 दिवसांची जेल झाली होती. जेलमधून बाहेर पडल्यानंतर फरदीनला नशामुक्ती केंद्रात पाठवण्यात आलं होतं.
बॉलिवूडच्या झगमगाटामध्ये बॉलिवूडमधील सत्य लपलं जातं. अनेक गोष्टी या ड्रग्सशी जोडलेल्या आहेत. यामध्ये अनेक स्टार्स अडकले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -