Dia Mirza Vaibhav Rekhi Wedding : दिया मिर्झा- वैभव रेखी आज अडकणार विवाहबंधनात
वैभव आणि दिया एकमेकांचे मित्र होते असंही म्हटलं जातं. वैभव मुंबईतील पाली हिल या उच्चभ्रू भागात राहतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'रहना है तेरे दिल मे' या 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या दिया मिर्झा आज विवाहबंधनात अडकणार आहे.
मुंबईतच तिच्या विवाहसोहळ्याचे विधी पार पडणार असल्याचं कळत आहे. दिया व्यावसायिक वैभव रेखी याच्यासह सात जन्मांसाठी एकमेकांची साथ देण्याचं वचनत देत लग्नगाठ बांधणार आहे.
'एबीपी न्यूज़ हिंदी'च्या वृत्तानुसार हा विवाहसोहळा अतिशय कमीत कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत आणि खासगी स्वरुपात पार पडणार आहे.
सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपल्या वैवाहिक नात्यात काही कारणांस्तव दुरावा आला असून, हे नातं संपुष्टात आल्याची माहिती समोर आली होती.
दिया तिच्या खासगी जीवनात एका नव्या पर्वाची सुरुवात करत आहे.
जीवनातील एका वादळाला सामोरं गेल्यानंतर हे सुख तिला लाभणार आहे.
यापूर्वी 2014 मध्ये दियानं साहिल संघा याच्याशी लग्न केलं होतं. 5 वर्षांच्या सहजीवनानंतर या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -