PHOTO | मालवणमधील धामापूर तलावाला 'वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट'चा दर्जा
यापैकी भारतात आंध्र प्रदेशमधील 'कुंबम तलाव' (सन 1706), 'के. सी. कॅनल' (सन 1863) , 'पोरुममीला टँक' (सन 1896) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धामापूर तलाव (सन 1530) यांना हा मान प्राप्त होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्ली येथील सेंट्रल वॉटर कमिशनला मालवण धामापूर येथील स्यमंतक संस्थेतर्फे धामापूर तलावाचे तपशीलवार डॉक्युमेंटेशन सेंट्रल वॉटर कमिशनला सादर केले होते. सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे 71व्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेमध्ये धामापूर तलावाला हा सन्मान दिला जाईल.
020 च्या 71व्या सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेमध्ये जगातील 14 साईट्सना 'वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट' म्हणून पुरस्कृत केले जाणार आहे.
2018 मध्ये कॅनडा येथे झालेल्या 69व्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेमध्ये भारताला पहिल्यांदा 'सदरमट्ट आनीकट्ट' आणि 'पेड्डा चेरु' या तेलंगणा राज्यातील दोन साईट्सना 'वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट' म्हणून पुरस्कृत केले होते.
मालवण तालुक्यातील धामापूर हे एक निसर्गरम्य गाव आहे. सदैव हिरवीगार असणारी घनदाट वृक्षराजी, माड-पोफळीची झाडे आहेत. दुतर्फा डोंगराच्याच मधोमध हा ऐतिहासिक तलाव आहे. या तलावाच्या काठावर श्री भगवतीचे प्राचीन देवालय आहे. पाच एकर क्षेत्रात पसरलेल्या विस्तीर्ण तलावाचा जलाशय अत्यंत नितळ आणि स्वच्छ आहे.
जगातील 74 हेरिटेज इरिगेशन साईटमध्ये जपानमधील 35, पाकिस्तानमधील एक आणि श्रीलंका येथील दोन साईट्स यांना हा जागतिक सन्मान आतापर्यंत मिळाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील धामापूर गावातील धामापूर तलावाला वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईटने पुरस्कृत केले आहे. आतापर्यंत तेलंगणातील दोन साईट्सना ही जागतिक ओळख मिळाली होती. यंदा आंध्र प्रदेशमधल्या तीन साईट्स आणि महाराष्ट्रातील धामापूर तलावाला प्रथमच हा जागतिक सन्मान मिळाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -