ACB Raid at Belgaum : कर्नाटकातील फिल्मी स्टाईल रेड पाहून तुम्हीही चक्रावून जाल! नोटाच नोटा; पण कुठे?

काही दिवसांपूर्वी आलेल्या एका बॉलिवूड पटात देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धाडीचं चित्रण करण्यात आलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
असचं काहीसा प्रकार काल कर्नाटकात घडला. कर्नाटकात काल लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं एकूण साठ ठिकाणी धाडी घातल्या. पण त्यानंतर जे समोर आलं ते खरंच हादरवणारं होतं. कारवाईदरम्यान, चक्क पाण्याच्या पाईपलाईनमध्ये नोटांची बंडल सापडले. ही घटना बेळगावातील गुलबर्ग्यात घडली.

पण त्यानंतर जे समोर आलं ते खरंच हादरवणारं होतं. कारवाईदरम्यान, चक्क पाण्याच्या पाईपलाईनमध्ये नोटांची बंडल सापडले. ही घटना बेळगावातील गुलबर्ग्यात घडली.
कर्नाटकात बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं एकूण साठ ठिकाणी धाडी घातल्या. ही लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं केलेल्या सर्वात मोठ्या कारवायापैकी एक आहे.
या कारवाईदरम्यान एसीबीनं एकूण साठ ठिकाणी धाडी घातल्या. यादरम्यान गुलबर्गा येथील एका सरकारी अधिकाऱ्याच्या निवासस्थानी तर कुबेराचा खजिनाच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या हाती लागला.
सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, सोन्याची नाणी, सोन्याच्या लगडी, चांदी या बरोबरच मोठी रोख रक्कम या अधिकाऱ्याच्या घरी मिळाली.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घराची कसून तपासणी केली. यावेळी पाणी वाहून जाणारे पाईप देखील त्यांनी तपासले.
यावेळी त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी शांत गौड यांच्या निवासस्थानी पाणी वाहून जाणाऱ्या पाईपमध्ये देखील सरकारी अधिकाऱ्याने नोटा लपवून ठेवल्याचं आढळून आलं.
हा सारा प्रकार पाहून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी देखील चक्रावून गेले होते.
लाचलुचपत खात्याचे अधिकारी आलेत, अशी माहिती कळताच शांतगौड आणि त्याच्या कुटुंबीयांनी पाईपमध्ये नोटा टाकून लपवण्याचा प्रयत्न केला. पण अधिकाऱ्यांनी प्लंबरला बोलवून पाईप उघडून नोटा हस्तगत केल्या आहेत.