Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! जळगावात 'सैराट'ची पुनरावृत्ती; लग्नाच्या 5 वर्षांनंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाला संपवलं
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात सैराट सिनेमाची पुनरावृत्ती घडली आहे. पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने संतापलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी 5 वर्षांनंतर मुलाचा काटा काढला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App5 वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून सासरच्या मंडळींनी कोयता आणि चॉपरने वार करत जावयाला ठार केल्याची घटना पिंप्राळा हुडको परिसरात घडली.
मुलीकडच्यांनी केवळ तरुणालाच संपवलं नाही, तर वार करताना मध्ये पडलेल्या त्याच्या कुटुंबातील 7 जणांवरही कोयता आणि चॉपरने वार केले.
रविवारी, 19 जानेवारीला सकाळी 9.30 वाजता घडलेल्या घटनेत जखमी तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबातील सात जण गंभीर जखमी झाले.
प्रेमविवाहातून झालेल्या या हत्याकांडानंतर संपूर्ण शहर सुन्न झालं आहे. परिसरात तणाव आहे.
या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकेश रमेश शिरसाठ (वय 26) असं मृत तरुणाचे नाव आहे. प्रेमविवाह केलेला तरुण आणि तरुणी दोघेही एकाच जातीचे आहेत. मुकेशच्या पश्चात आई-वडील भाऊ पत्नी व मुलगी असा परिवार आहे.
मुकेश रमेश शिरसाठ याने पाच वर्षांपूर्वी जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरात पूजा नामक तरुणीशी पळून जाऊन प्रेमविवाह केला. तेव्हापासून शिरसाट कुटुंबीय आणि तरुणीच्या माहेरील मंडळींमध्ये वाद सुरू होते.
रविवारी सकाळी मुकेश दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला. त्यावेळी मुलीच्या माहेरच्या मंडळींनी कोयता आणि चोपरने मुकेशच्या मानेवर वार केला.
यात गंभीर दुखापत झाल्याने मुकेशचा जागीच मृत्यू झाला. मुकेशवर वार होत असताना त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मुकेशचा भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ, चुलत बहीण यांच्यावरही मुलीच्या माहेरच्यांनी वार केले असून यात कुटुंबातील 7 जण जखमी झाले आहेत.