Global Recession: जगासाठी तीन दशकात तिसऱ्यांदा धोक्याची घंटा, गरीब देशांची चिंता वाढणार!
जगभरात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मंदीचे सावट आणखी गडद होऊ लागले आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमागील तीस वर्षात तिसऱ्यांदा जागतिक अर्थव्यस्थेची चिंता वाढली आहे. या मंदीचा तडाखा गरीब देशांना अधिक बसण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
जागतिक बँकेने आपल्या अहवालात ही बाब नमूद केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दराचा अंदाजही जागतिक बँकेने घटवला आहे.
अमेरिकेसह युरोप आणि चीन या सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांच्या विकास दरात घट झाल्यामुळे चालू वर्षात जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली आली असल्याचे जागितक बँकेने म्हटले.
जागतिक बँकेने 2023 साठी जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर 1.7 टक्क्यांवर आणला आहे. याआधी हा दर 3 टक्के इतका होता.
जागतिक बँकेने वर्तवलेला अंदाज खरा ठरल्यास तीन दशकांत ही तिसऱ्यांदा आर्थिक विकास दर सर्वात कमकुवत असणार असल्याचे म्हटले जात आहे.
जागतिक मंदीचा फटका गरीब देशांना अधिक बसण्याची शक्यता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
चीनच्या अर्थव्यवस्थेत आलेल्या मंदीचा फटका युरोपीयन देशांना बसू शकतो, असेही जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटले.
गरीब देशांमधील गुंतवणुकीचा ओघ कमी होण्याची शक्यता असून तसे झाल्यास गरीब देश आणखी अडचणीत सापडतील असा अंदाजही जागतिक बँकेच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.