Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कधीच करू नका 'या' सहा चुका, अन्यथा सिबील स्कोअर गडगडलाच म्हणून समजा; कर्ज मिळणंही होईल कठीण
अनेकजण सिबील स्कोअरकडे दुर्लक्ष करतात. याच दुर्लक्षामुळे त्यांच्याकडून काही चुका होतात. ज्यामुळे त्यांचा सिबील स्कोअर तर खराब होतोच. शिवाय त्यांना कोणती बँक कर्जही देत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळेच सिबील स्कोअर खराब होऊ नये म्हणून काही काळजी घेणे गरजेचे आहे. यातील सर्वात महत्त्वाची खबरदारी म्हणजे ईएमआय वेळेत भरले पाहिजेत. ईएमआय भरण्यास विलंब झाला किंवा ईएमआय न भरल्यास बँक तुम्हाल डिफॉल्टच्या श्रेणीत टाकते. त्यामुळे सिबील स्कोअर खराब होतो.
तुम्ही एखादे मोठे कर्ज घेतले असेल तर तुमचा सिबील स्कोअर खराब होतो. तुमच्याकडे अगोदरच मोठे कर्ज आहे. त्यामुळे आणखी कर्ज दिल्यास तुम्ही ते फेडू शकणार नाहीत, असे बँक गृहित धरते. त्यामुळेच तुमचे सिबील स्कोअर कमी होतो.
तुम्ही क्रेडिट कार्डच्या मदतीने खूप सारी खरेदी केली, तर त्याचा परिणाम तुमच्या सिबील स्कोअरवर होतो. क्रेडिट कार्डचा जास्त वापर केल्यास तुमचा क्रेडिट कार्ड युटिलायझेशन रेशो वाढतो. त्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर कमी होतो.
तुम्ही सतत क्रेडिट कार्डसाठी अर्ज करत असाल तर त्याचादेखील तुमच्या सिबील स्कोअरवर परिणाम पडतो. तुम्ही अनेकवेळा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केल्यास तुमच्या बँक खात्याची हार्ड इन्क्वायरी होते. मात्र तुमचा कमी हा सिबिल स्कोअर कायमस्वरुपी नसतो.
तुम्ही एखादे क्रेडिट कार्ड बंद केल्यावरेदखील सिबिल स्कोअर कमी होतो. कारम क्रेडिट कार्ड बंद केल्यानंतर तुमची क्रेडिट कार्डची लिमिट आपोआपच कमी होते. परिणामी तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो वाढतो. परिणामी तुमचा सिबिल स्कोअर कमी होतो.
कालावधीच्या अगोदर तुम्ही कर्जाची परतफेड केली तर सिबील स्कोअर कमी होऊ शकतो. मात्र हा सिबिल स्कोअर अल्पावधीसाठी कमी होतो. कालांतराने तो पुन्हा वाढतो.