आशियातील 'या' पाच कुटंबांकडे आहे गडगंज पैसा, सर्वांधिक श्रीमंतांमध्ये अंबानी परिवाराचा कितवा नंबर?
सामान्य माणसाला श्रीमंतांबाबत नेहमीच उत्सुकता असते. ते कसे राहतात. त्यांच्या उद्योगांची नावे काय आहेत? असे नेहमीच विचारले जाते. याच पार्श्वभूमीवर आशिया खंडातील पाच सर्वाधिक श्रीमंत कुटुंबांची नावे जाणून घेऊ या...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या 14 वर्षांपासून अंबानी कुटुंब हे आशियातील सर्वाधिक श्रीमंत कुटंब आहे.
त्यानंतर क्रमांक येतो तो हार्टोनो कुटुंबाचा. या कुटुंबाच्या संपत्तीत 28 टक्के वाढ झाली आहे. सध्या या कुटुंबाकडे 44.8 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. खाद्य आणि वेगवेगळी पेय निर्माण करण्याचा या कुटुंबाचा व्यवसाय आहे.
यानंतर तिसरा क्रमांक येतो तो मिस्त्री कुटुंबाचा. या घराण्याकडे एकूण 36.2 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.
यानंतर चौथा क्रमांक येतो तो क्वोक कुटुंबाचा. या कुटुंबाकडे एकूण 32.3 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. रियल इस्टेट क्षेत्रात त्यांचा व्यवसाय आहे. सन हंग काई प्रॉपर्टीज कंपनीच्या अंतर्गत त्यांचे वेगवेगळे व्यवसाय येतात.
आशियात सर्वांत श्रींमत कुटुंबांच्या यादीत पाचव्या स्थानी चियाराव्हॅनोंत कुटुंब येतं. या कुटुंबाकडे एकूण 31.2 अब्ज डॉलर्स संपत्ती आहे. या कुटंबाचे कॅरोएन पोख्फंड ग्रुप अंतर्गत या कुटंबाचे वेगवेगळे व्यवसाय आहेत.